ETV Bharat / state

आयुध निर्माणी परिसरात बिबट्यांचा वावर, नागरिकांत दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन बिबटे एकाचवेळी या परिसरात फिरताना कर्मचाऱ्याना दिसले.

author img

By

Published : Jan 29, 2020, 7:38 PM IST

Leopard were seen in the area of ayudh nirmani
आयुध निर्माणी परिसरात बिबट्यांच्या वावर, नागरिकांत दहशत

चंद्रपूर - जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये सध्या बिबट्याचे दर्शन होत आहे. एक नव्हे, तर दोन-दोन बिबटे एकाचवेळी या परिसरात फिरत आहेत. नर-मादीची ही जोडी असल्याचे सांगितले जात आहे.आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या नवीन डीएससी सदनिकांजवळ बिबट्यांची ही जोडी दिसून आली. नागरी वस्तीत हा वावर बघायला मिळाल्याने सध्या रात्री बाहेर पडणे लोकांनी बंद केले आहे.

आयुध निर्माणीचा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असून ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत आहे. त्यामुळे या परिसरात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली व इतर वन्यजीवांचा वावर दिसून येतो. काही दिवसांपूर्वी एका बिबट्याने खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला होता. मात्र, आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने हा बिबट्या पळून गेला. आता पुन्हा येथे दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Intro:चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये सध्या बिबट्याचं दर्शन होत आहे. एक नव्हे, तर दोन-दोन बिबटे एकाचवेळी फिरत आहेत. नर-मादाची ही जोडी असल्याचं सांगितलं जातं. आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या नवीन डीएससी सदनिकांजवळ बिबट्यांची ही जोडी दिसून आली. नागरी वस्तीत हा वावर बघायला मिळाल्यानं सध्या रात्री बाहेर पडणं लोकांनी बंद केलं.

आयुध निर्माणीचा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. सोबतच ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत आहे. त्यामुळं या परिसरात पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वली व इतर वन्यजीवांचा वावर दिसून येतो. काही दिवसांपूर्वी एका बिबटयाने खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला होता. मात्र, आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने हा बिबट्या पळून गेला. आता पुन्हा येथे दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.