मुंबई Blockbuster Sunday : 6 ऑक्टोबर म्हणजेच रविवारचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बॉलबस्टर ठरणार आहे. कारण या दिवशी चाहत्यांना क्रिकेट सामन्यांचा दुहेरी आनंद मिळणार आहे, कारण भारतीय संघ आठ तासांत दोन सामने खेळणार आहे. ज्यात एकीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ बांगलादेशसोबत दोन हात करताना दिसणार आहे.
Gearing 🆙 in Gwalior with radiant rhythm and full flow 👌👌 #TeamIndia hone their fielding skills ahead of the #INDvBAN T20I series opener 🙌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/RjbUb7scXe
— BCCI (@BCCI) October 4, 2024
भारत आणि पाकिस्तान आमनेसामने : ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या सातव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजल्यापासून खेळवला जाईल. युएइत सुरु असलेल्या ICC महिला T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 58 धावांनी पराभूत केलं होतं, तर पाकिस्तानलाही आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळं दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळं हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश आमनेसामने : दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या पुरुष संघांमध्ये रविवारपासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून तीन T20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघ सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या पुरुष क्रिकेट संघासोबत खेळताना दिसणार आहे. हा सामना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी सायंकाळी 7 वाजेपासून खेळवला जाईल. दोन्ही संघांदरम्यान नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघानं एकहाती वर्चस्व राखत मालिका 2-0 नं जिंकली होती. यानंतर आता T20 मालिका जिंकण्याचा भारतीय युवा ब्रिगेडचा प्रयत्न असेल.
दोन्ही सामने कुठं दिसतील लाईव्ह : ICC महिला T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल तर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला T20 सामना भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल, तर जियो सिनेमावर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.
हेही वाचा :