ETV Bharat / state

बिबट्याच्या चामडीसह ९ आरोपी ताब्यात; भरारी पथकाची कारवाई - leoppard skin smuglling in chandrapur

कोरपना तालुक्यातील कुसळ गावात जगदीस लिंगू जुमनाके या व्यक्तीच्या घरी बिबट्याची कातडी असल्याची गुप्त माहिती राजुरा वनविभागाच्या भरारी पथकाला मिळाली. भरारी पथकाने छापा टाकल्यानंतर या ठिकाणाहून पथकाला पुढील सुगावे मिळत गेले, आणि तेलंगणातील....

बिबट्याच्या चामडीसह नऊ आरोपी ताब्यात, भरारी पथकाची कार्यवाही
author img

By

Published : Oct 29, 2019, 4:03 AM IST

Updated : Oct 29, 2019, 12:12 PM IST

चंद्रपूर - तेलंगणा वनविभागाच्या आधारे भरारी पथकाने छापा टाकत बिबट्याचा चामडीसह नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. छाप्यात कोरपणा तालुक्यातून दोन तसेच तेलंगणातून सात असे एकूण नऊ आरोपी वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या अवयवांची अवैधरित्या विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती राजुरा वनविभागाला मिळाली होती.

leopard skin seized in chandrapur 9 arrested
बिबट्याची चामडी

हेही वाचा - 'लोकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला नाकारले'

यानुसार, भरारी पथकाने कुसळ गावातील जगदीस लिंगु जुमनाके या व्यक्तीच्या घरी छापा टाकून बिबट्याची कातडी जप्त केली. संबंधित आरोपीची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. या माहितीच्या आधारे तेलंगणातील पेवठामधून मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला वनविभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी सापळा, बिबट्याची नखे तसेच दात सापडले आहेत.

दोन्ही आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे कोरपना तालुक्यातील चिंचोली तसेच तेलंगणातील बंबारा, चिचपल्ली या ठिकाणांहून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, पी.जी.कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली फनिंद्र गादेवार, एस.एन.बासमवार, गजानन इंगडे, ओंकार थेरे यांनी ही कारवाई केली.

Intro:बिबट्याचा चामडीसह नऊ आरोपी ताब्यात ; भरारी पथकाची कार्यवाही ;चंद्रपुर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर

गुप्त माहीतीचा आधारे वनविभागाचा भरारी पथकाने छापा टाकला.छाप्यात बिबट्याचे चमडे,शिकारीचे साहीत्य,दात सापडले. चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपणा तालूक्यातून दोन आरोपी तर तेलंगाणातून सात असे एकुण नऊ आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे

प्राप्त माहीती नुसार चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालूक्यात वन्यजीवांची शिकार करुन त्यांचा अवयवांची विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहीती राजूरा वनविभागाला मिळाली होती.
कोरपना तालूक्यातील कुसळ या गावातील जगदीस लिंगु जूमनाके याचा घरी बिबट्याची कातडी असल्याची गुप्त माहीती राजूरा वनविभागाचा भरारी पथकाला मिळाली. भरारी पथकाने छापा टाकला असता बिबट्याची कातळी सापडली. आरोपी अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. आरोपीने दिलेल्या माहीतीचा आधारे तेलंगाणातील पेवठा येथून मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला वनविभागाने ताब्यात घेतले.त्याचा घरी शिकारीसाठी वापरला गेलेला लोखंडी सापळा,बिबट्याचे नख,दात आढळून आले. दोन्ही आरोपीने दिलेल्या बयानाचा आधारे कोरपना तालूक्यातील चिंचोली,तेलंगणातील बंबारा ,चिचपल्ली येथून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हीरे,पी.जी.कोडापे यांच्या मार्गदर्शनात फनिंद्र गादेवार,एस.एन.बासमवार,गजानन इंगडे,ओंकार थेरे,विदेशकुमार गलगट,विकास शिंदे,जाधव,थेरे यांनी कार्यवाही केली. या कार्यवाहीत तेलंगणातील वनविभागाचे मोठे सहकार्य होते .Body:फोटोConclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.