ETV Bharat / state

Leopard Dead in Chandrapur : सोमनाथ प्रकल्पातील विहिरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत - बिबट्या लेटेस्ट न्यूज

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरातील विहिरीत एक बिबट्या आज (शुक्रवार) मृतावस्थेत आढळून ( Leopard Dead in Chandrapur ) आला. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्याचे वय तीन ते चार वर्षांचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leopard Dead in Chandrapur
विहिरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत
author img

By

Published : Feb 4, 2022, 5:32 PM IST

चंद्रपूर - मूल येथील सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरातील विहिरीत एक बिबट्या आज (शुक्रवार) मृतावस्थेत आढळून ( Leopard Dead in Chandrapur ) आला. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्याचे वय तीन ते चार वर्षांचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या शिकारीचा पाठलाग करताना ह्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विहीरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत -

मूल तालुक्यातील सोमनाथ येथे स्वर्गीय बाबा आमटे यांचा प्रकल्प आहे. या परिसरात कठडे असलेली विहीर आहे. आज दुपारच्या सुमारास एक बिबट्या येथे मृतावस्थेत आढळून आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचा बफर क्षेत्र याला लागून आहे. त्यामुळे या परिसरात वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. आज दुपारच्या सुमारास येथील विहीरीत बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. कठडे असूनही हा बिबट्या विहिरीत पडला. त्यामुळे ही घटना शिकारीचा पाठलाग करताना घडली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ही घटना एकदोन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मूल येथील वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाचे पथक घटनास्थळी पोचले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - Indo-Pak Border Shivaji Maharaj Statue : भारत-पाक सीमेवर १5 हजार फूटावर छत्रपती शिवरायांचा पुतळा; मूर्तिकार तरुणाशी खास बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.