ETV Bharat / state

'कल्याणा'च्या नावावर क्रूर थट्टा; 60 हजार कामगार योजनांच्या लाभापासून वंचित - चंद्रपूर कामगार योजना न्यूज

शासनाने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. मात्र, कामगारांना याचा लाभ मिळतोच असे नाही. अनेकदा यंत्रणेच्या उदासीनते अभावी कामगारांना या हक्काच्या योजनांना मुकावे लागते.

Press conference
पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 14, 2020, 10:23 AM IST

चंद्रपूर - औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या जिल्ह्यात संघटित, असंघटित कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या योजनांच्या नावाने कामगारांची क्रूर थट्टा सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून 60 हजार कामगार विविध योजनांच्या लाभापासून वंचित आहेत, असा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कामगार विविध योजनांपासून वंचित असल्याचे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना नोंदणी कार्ड काढावे लागते. या कार्डचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते. मात्र, मागील आठ महिन्यांपासून ऑनलाइन, ऑफलाइन खेळात कामगारांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया अडकली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळात सध्या १ लाख २० हजार कामगारांची नोंद आहे. त्यातील अधिकांश कामगारांच्या कार्डचे नुतनीकरणच झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे. १९९६ रोजी या मंडळाची स्थापना राज्यात झाली. या मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. बांधकामातून प्राप्त होणाऱया करातून मिळणारा निधी या कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येतो. इमारत, रस्ते, रेल्वे, ट्रॉमवेज, पाटबंधारे, जलनिस्सारण, टॉवर, बंधारे, कालवे, धरणे, पूल, सेतू आणि पाइपलाइन या कामाचे बांधकाम, या क्षेत्रातील कामगारांचा समावेश होतो. कामगारांसाठी राबवण्यात येणाऱया योजनांसाठी त्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात अगोदर नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतरच त्यांना योजनांचा लाभ दिला जातो.

मार्च महिन्यात कार्ड नूतणीकरणाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्यानंतर ती ऑफलाइन करण्यात आली. मात्र, काही दिवसानंतर तीही थांबवण्यात आली आहे. आता तर कोरोनाचे कारण समोरकरून नुतनीकरणाची प्रक्रियाच ठप्प पडून आहे. याचा मोठा फटका कामगारांना बसत आहे. कोरोनाच्या काळात उद्योगधंदे ठप्प पडले. कामगारांचा रोजगार गेला. कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत योजनांचा लाभ मिळाला असता तर कामगारांना दिलासा मिळाला असता. मात्र, हक्काच्या योजनांपासूनही कामगारांना वंचित रहावे लागत आहे, असे डॉ. गावतुरे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत डॉ. सीराज खान, शाहिदा शेख आणि भूमिपुत्र ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.