ETV Bharat / state

किसान आंदोलन चंद्रपुरात आक्रमक; विसापूर येथे 'टोल मुक्ती'आंदोलन

author img

By

Published : Dec 13, 2020, 12:30 PM IST

केंद्रसराकरच्या नवीन कृषी कायद्याविरोधात किसान आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत चंद्रपुरातील जनविकास सेनेच्या वतीने विसापूर टोलानाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी टोलमुक्ती आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला.

jan vikas sangahtna protest on
विसापूर येथे 'टोल मुक्ती'आंदोलन

चंद्रपूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलन तर्फे देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चंद्रपुरातील जन विकास सेनेच्यावतीने बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोल नाका येथे टोलमुक्ती आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष आणि मनपा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलकांनी टोळनाक्यावर जबरदस्तीने वाहने सोडल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करत गुन्हे दाखल करून सोडून दिले.

टोलनाक्यावर आंदोलक आक्रमक-

जनविकास संघटनेचे शेकडो कार्यकर्ते या किसान आंदोलनसाठी वाहनांनी रॅली काढत विसापूरच्या टोलनाक्यावर पोहोचले. त्यानंतर विसापूर टोल नाका येथे आदोलकांनी जड वाहनांसाठी टोलनाका मुक्त केला. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी बळजबरीने वाहने सोडणे सुरू केले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक पुरेशा पोलीस बळासह घटनास्थळी दाखल होत आंदोलनकांना ताब्यात घेतले. तसेच या आंदोलकांना बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करून कलम 68 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात आले.

किसान आंदोलन चंद्रपुरात आक्रमक

या आंदोलनामध्ये किसान आंदोलन चंद्रपूरचे चमकोर सिंग बसरा, बलबीर सिंग गुरम, गुरूपाल सिंग, ग्यान सिंग, जितेंद्र सिंग बलोदा, दलजीत सिंग नरेन यांच्या नेतृत्वात असंख्य शीख बांधवांनी तसेच जन विकास सेना ग्रामीण शाखेचे अनिल कोयचाळे, धर्मेंद्र शेंडे, चंदू झाडे, प्रवीण मटाले, आकाश लोडे, हरिदास निकुरे, सत्यजित वाघमारे, भैय्याजी मोहुर्ले, जीवन कोटरंगे यांचा सहभाग होता.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-

दिल्ली येथील किसान आंदोलनातील आंदोलकांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवे कृषी कायदे तयार करण्याच्या आणि हमीभावाला कायदेशीर संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दिनांक १४ डिसेंबरला देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. किसान आंदोलन चंद्रपूर तर्फे सुध्दा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान आंदोलन चंद्रपूरचे पप्पू देशमुख, चमकोर सिंग बसरा व बलबिल सिंग गुरम यांनी
केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.