ETV Bharat / state

चंद्रपूरमधील इरई धरण भरले; दोन दरवाजातून विसर्ग सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील महाऔष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारे इरई धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

चंद्रपूरमधील इरई धरण भरले
author img

By

Published : Aug 22, 2019, 4:52 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशयांतील पाणासाठा वाढला आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारे इरई धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

चंद्रपूरमधील इरई धरण भरले
सध्या इरई धरणाची पाणी पातळी 207 मीटरपर्यंत पोचली. धरण 97.73 टक्के भरल्यामुळे दुपारी बारा वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो. ऐनवेळी पाण्याचा विसर्ग केल्यास कृत्रिम पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आज दोन दरवाजे उघडण्यात आले, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.

Intro:चंद्रपुर : इरई धरण तुडुंब भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 0.25 मीटर ने हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला चंद्रपुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्प पूर्णपणे तुडुंब भरले. यातील सर्वात मोठे धरण इरई ह्याचे सुद्धा सात दरवाजे उघडण्यात आले होते. यानंतर देखील सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस सुरू होता. आज इरई धरणाची पाण्याची पातळी 207 मीटर पर्यंत पोचली होती. एकूण 97.73 टक्के हे धरण भरल्यामुळे दुपारी बारा वाजता ह्या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. 0.25 मीटर उंचीने हे दरवाजे उघडण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो. अशावेळी पाण्याचा विसर्ग केल्यास कृत्रिम पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आज दोन दरवाजे उघडण्यात आले.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.