चंद्रपूर - शहरातील कोळसा चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यासोबत कोळसा डेपोवरही छापे टाकण्यात आले आहेत. हजारो कोटींच्या कोळसा चोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आयकर विभागाने शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल या व्यापाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी केली आहे. यामध्ये चार स्वतंत्र पथकांद्वारे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली आहे. अजूनही त्याच्या घरांची झडती सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे व्यापारी कोळसा चोरी करत होते.