ETV Bharat / state

पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन, आता डिझेल भरायला पैसे नाहीत.. 'या' नदीच्या खोलीकरणाचे काम थंडबस्त्यात - इरई नदीच्या खोलीकरणाचे काम थांबले

४ एप्रिल रोजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार ( Gaurdian Minister Vijay Wadettiwar ) यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेल्या चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या ( Irai River Chandrapur City ) खोलीकरणाचे काम ठप्प पडले ( Irai River Deepen Work Stopped ) आहे. मोठ्या थाटात सुरु झालेले हे काम आता डिझेल भरायलाही पैसे नसल्याने थंडबस्त्यात पडले आहे.

Inauguration by the Guardian Minister
पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
author img

By

Published : May 11, 2022, 9:36 AM IST

Updated : May 11, 2022, 10:33 AM IST

चंद्रपूर : चंद्रपूर शहराची जीवनदायी असणाऱ्या इरई नदीच्या ( Irai River Chandrapur City ) खोलीकरणाचे उद्घाटन 4 एप्रिल रोजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार ( Gaurdian Minister Vijay Wadettiwar ) यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. यासाठी पाटबंधारे विभागातील अनेक मोठमोठ्या मशिन्स अमरावती, नागपूर येथून मागविण्यात आल्या. मात्र, यासाठी आवश्यक असणारा शासनाचा निधीच मिळाला नाही. आता या गाड्यांमध्ये भरण्यासाठी डिझेल नसल्याने काम बंद ठेवण्याची नामुष्की पाटबंधारे विभागावर ओढवली ( Irai River Deepen Work Stopped ) आहे.

इरई नदी ही चंद्रपूर शहराला वेढा घालून वाहते. याच नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून चंद्रपुरकारांची तहान भागवली जाते. मात्र जेव्हा पाऊस येतो त्यावेळी नदीच्या आजूबाजूला पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. याचा फटका चंद्रपूर शहराला बसत असतो. त्यामुळे या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण आवश्यक आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 13 फेब्रुवारीला चंद्रपुरात आले असता, त्यांनी इरई नदीला भेट देत ही स्थिती समजून घेतली. यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा सोबत होते. त्यानंतर संपूर्ण खोलीकरण करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. पडोली रेल्वे पुलापासून तर चोराळा पुलापर्यंत साडेसात किलोमीटर लांबी असलेल्या नदीचे खोलीकरण, गाळ उपसा करण्यात येणार होता. यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी लागणार होता. यातून पाच लाख क्यूबिक टन इतका गाळ उपसण्यात येणार होता. पाटबंधारे विभागातील यांत्रिकी उपविभागाच्या माध्यमातून हे सर्व काम होणार होतं. यासाठी याच विभागातील मोठमोठ्या मशिन्स नागपूर आणि अमरावती येथून बोलाविण्यात आल्या. 4 एप्रिलला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या खोलीकरणाच्या कामाचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शामसुंदर काळे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता दाणी हे उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन, आता डिझेल भरायला पैसे नाहीत 'या' नदीच्या खोलीकरणाचे काम थंडबस्त्यात

निधी आला नसताना देखील हे काम सुरू करण्यात आले. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत हे काम चालणार होते. मात्र प्रत्यक्षात 10 दिवस हे काम चालले आणि केवळ 100 फूट इतक्या लांबीचाच गाळ उपसा करता आला. मशिन्समध्ये जितके डिझेल होते ते संपले. आता डिझेल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न पाटबंधारे विभागासमोर पडला आणि अखेर हे काम बंद पडले.

पाटबंधारे विभागासमोर इकडे आड तिकडे विहीर : या कामासाठी पाच पोकलेन लावण्यात आले, त्यापैकी प्रत्येकी एक अमरावती आणि नागपूर विभागातून मागविण्यात आला. त्याचप्रमाणे नऊ टिप्पर यासाठी मागविण्यात आले. त्यापैकी तीन टिप्पर अमरावती तर पाच टिप्पर नागपूर येथील आहेत. मात्र, यामुळे नागपूर आणि अमरावतीच्या पाटबंधारे विभागाला कामात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ही मशीन आणि वाहने परत करण्याचे पत्र संबंधित विभागाने चंद्रपूर विभागाला पाठविले. इकडे निधी आला नाही, काम बंद आहे तर दुसरीकडे ही वाहने परत बोलाविण्याचा तगादा सुरू आहे. पाठवले तर अडचण आणि नाही पाठवले तरी अडचण, अशी परिस्थिती पाटबंधारे विभागाची झाली आहे.

पालकमंत्र्यांनी केली होती 60 कोटींची घोषणा : या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी या कामासाठी शासकीय निधी व्यतिरिक्त आपल्या खात्यातून 60 कोटी निधी देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र शासनाचे ना सहा कोटी आले ना आपत्ती व्यवस्थापन खात्यातून 60 कोटी. पावसाळा सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे हे काम सुरू होणार का आणि झाले तर पूर्ण होणार का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा : याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शामसुंदर काळे आणि यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता दाणी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काम बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शासनाच्या निधीच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, निधी मिळाल्यावर त्वरित काम सुरू करण्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी 100 कोटींचा निधी; आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांची माहिती

Last Updated : May 11, 2022, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.