ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात 1265 जण कोरोनामुक्त, 1125 पॉझिटिव्ह तर 24 मृत्यू - Corona patient death number Chandrapur

जिल्ह्यात काल 24 तासांत 1 हजार 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1 हजार 125 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली असून 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Review Chandrapur
कोरोना आढावा चंद्रपूर
author img

By

Published : May 2, 2021, 4:11 AM IST

Updated : May 2, 2021, 6:29 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात काल 24 तासांत 1 हजार 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1 हजार 125 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली असून 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - चंद्रपूर : कोरोनाच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय 'व्हेंटिलेटर'वर.. सरकारने प्रक्रियेत गुंडाळली वैद्यकीय अव्यवस्था

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 61 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच, सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 44 हजार 88 झाली आहे. सध्या 16 हजार 420 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 53 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 14 हजार 491 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

काल मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथील 83 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45 वर्षीय महिला, नगीना बाग परिसरातील 49 वर्षीय पुरुष, 56 व 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 58 वर्षीय पुरुष, सुमित्रा नगर परिसरातील 45 वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 54 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 26 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील 60 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53, 65 व 70 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिसी येथील 64 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 29 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 44 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 929 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 859, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक, वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या 1 हजार 125 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 442, चंद्रपूर तालुका 96, बल्लारपूर 86, भद्रावती 12, ब्रम्हपुरी 63, नागभिड 89, सिंदेवाही 3, मूल 49, सावली 34, पोंभुर्णा 6, गोंडपिपरी 57, राजूरा 40, चिमूर 41, वरोरा 31, कोरपना 30, जिवती 20 व इतर ठिकाणच्या 26 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

हेही वाचा - ताडोबा क्षेत्रात विहिरीत पडून दोन अस्वलांसह दोन पिलांचा मृत्यू

Last Updated : May 2, 2021, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.