ETV Bharat / state

चिमूर शहरात चक्रिवादळाने केला कहर, नागरिकांच्या घरांची पडझड - heavy rain with hurricane in chimur

झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित भरपाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महसूल विभागामार्फत तलाठी मडावी यांनी नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा केला आहे.

hurricane in chimur
चिमूर चक्रिवादळ नुकसान
author img

By

Published : May 11, 2020, 12:16 PM IST

चंद्रपूर- चिमूर शहरात मध्यरात्री १.३० च्या सुमारास तूफान चक्रिवादळासह जोरदार पाऊस आला. यामुळे नगर परिषद क्षेत्रातील अनेक घरांचे छप्पर उडाले, तर काही घरांची पडझड झाली आहे. झाडे सुद्धा कोलमडून पडलीत, त्यामुळे विजेच्या तारा सुद्धा तुटल्या. यामुळे नागरिकांना आंधारात रात्र काढावी लागली.

अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसाने नागरिकांना धडकी भरवली. चक्रिवादळामुळे नेताजी वॉर्ड येथील छबी लालजी कामडी यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडाले. या घटनेत कामडी यांची मुलगी वर्षा हिच्या डोक्याला किरकोळ मार लागला. तसेच, राजू कवडू बनकर यांचा बैलाचा गोठा, अमित सुभाष अगडे यांच्या घराचे छत, गुरुदेव वॉर्डातील नारायण पचारे यांचे सीलिंग पंख्यासह छप्पर उडाले. बामणी येथील प्रभाग क्रमांक १७ मधील हरीचंद्र जांगडे यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांच्या घराचेही नुकसान झाले.

वादळामुळे नगर परिषद क्षेत्रातील अनेक झाडे पडली आहेत. त्याचा फटका विजेच्या तारांनीही बसला आहे. विजेच्या तारा तुटल्याने विजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित भरपाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महसूल विभागामार्फत तलाठी मडावी यांनी नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा- चिमूर पोलिसांकडून देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; एक लाख रुपये किंमतीची देशी दारू जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.