ETV Bharat / state

चंद्रपूर : अवैधरित्या साठवणूक केलेले तीन लाखांचे चोरबीटी बियाणे जप्त, गोंडपिपरी पोलिसांची कारवाई - chor bt cotton smuggling chandrapur

गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथे चोरबीटीचा मोठा साठा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यानंतर गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, ठाणेदार संदीप धोबे यांनी संयुक्तपणे कारवाई केली. चैकशीदरम्यान धानापूर येथील गजानन ढवस, साईनाथ वडस्कर यांच्याकडून तब्बल पावने तीन लाख रुपये किमतीचे, चारशे चोरबीटी बियाणांचे पॅकेट जप्त करण्यात आले.

धानापूरात चोर बीटीची चारशे पॕकेट पकडले
धानापूरात चोर बीटीची चारशे पॕकेट पकडले
author img

By

Published : Jun 3, 2020, 3:35 PM IST

चंद्रपूर - शेतीचा हंगाम सुरू होण्यावर असून शेतकरी बांधव कामाला लागला आहे. अशावेळी चोरबिटीची बियाणांची तस्करी मोठया प्रमाणावर सुरू आहे. काल(मंगळवार) रात्रीच्या सुमारास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे, तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी संयुक्तपणे कार्यवाही केली. या कार्यवाहीत धानापूर येथील गजानन ढवस याच्याकडून चोरबीटी बियाणांचे चारशे पॅकेट जप्त करण्यात आले.

चोरबीटी लागवडीला महाराष्ट्रात बंदी आहे. याचाच फायदा घेत तस्करांकडून चोरबीटीचा मोठा व्यवसाय सुरू आहे. राजकीय पक्षातील काही नेत्यांचाही यात समावेश आहे. गोंडपिपरी तालुका तेलंगणाच्या सीमेलगत आहे. यामुळे तेलंगणातून चोरबीटी बियाणांची तस्करी करून तिप्पट किमतींनी ते शेतकऱ्यांना विकल्या जात आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या सीमा प्रशासनाकडून सील करण्यात आल्या असल्या तरीही तस्कर मात्र सक्रिय आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथे चोरबीटीचा मोठा साठा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यानंतर गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, ठाणेदार संदीप धोबे यांनी संयुक्तपणे कारवाई केली. चैकशीदरम्यान धानापूर येथील गजानन ढवस, साईनाथ वडस्कर यांच्याकडून तब्बल चारशे चोरबीटी बियाणांचे पॅकेट जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, जप्त करण्यात आलेल्या चोरबीटीची किंमत 2 लाख 92 हजार रुपये असल्याची माहिती पोलीसांनी दिली. ही चोरबीटी नेमकी कुठून आणली, चोरबिटी तस्करीतील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलीस करत आहेत. ठाणेदार संदीप धोबे, तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात विजयकुमार कोमल्ला, रतनसिंग चव्हाण यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.