चंद्रपूर - घरातील जनरेटरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा करून अंत झाल्याची दुर्दवी घटना आज सकाळी दुर्गापुरात घडली. या कुटुंबातील एका मुलाचा नुकताच विवाह झाला होता, त्याच्यासह सुनेचा देखील मृत्यू झाला आहे.
कसा झाला मृत्यू
लग्नसमारंभाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्व पाहुणे आपापल्या गावी गेले. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आल्याने अचानक वीज खंडित झाली. यानंतर लष्कर कुटुंबाने जनरेटर लावलले. सकाळी साडे सहा वाजता कुटुंबातील सर्व जण उठले. मात्र, उशिरापर्यंत यापैकी कोणीही उठले नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज दिला. मात्र, कोणीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडल्यावर घरात सर्वत्र धूर होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये रमेश लष्कर (45), अजय लष्कर (२१), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.
महिलेची स्थिती गंभीर
दासू लष्कर या महिलेची स्थिती गंभीर आहे. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. अप्पर पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जनरेटरच्या स्फोटाने विषारी वायूची गळती झाली. आणि त्यातून ही घटना झाली असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा - माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन