ETV Bharat / state

गोलुच्या कोंबड बाजाराची बंगळुरूपर्यंत मजल; जुगार खेळण्यासाठी श्रीमंत ग्राहकांना आमंत्रण - चंद्रपूर कोंबडा बाजार न्यूज

दिवाळीनंतर जिल्ह्यात कोंबड बाजाराचे जणू पीक आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा अवैध प्रकार सुरू आहे. मात्र, यातील सर्वात मोठा आणि सुसज्ज असा कोंबड बाजार राजुरा तालुक्यातील आर्वी येथे सुरू आहे. एखादी यात्रा वाटावी असे या कोंबड बाजाराचे स्वरूप आहे. या बाजाराचा म्होरक्या गोलू नामक व्यक्ती असल्याची माहिती आहे.

Gambling on Rooster Fight in chandrapur district
गोलुच्या कोंबड बाजाराची बंगळुरूपर्यंत मजल; जुगार भरविण्यासाठी श्रीमंत ग्राहकांना आमंत्रण
author img

By

Published : Dec 17, 2020, 5:31 AM IST

चंद्रपूर - राजुरा तालुक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्वी येथे कोंबड बाजार आणि जुगार सर्रासपणे सुरू आहे. गोलू नामक व्यक्ती याचा मुख्य सूत्रधार आहे. या अवैध धंद्यात जम बसविल्यावर आता गोलुने आपला मोर्चा जुगार खेळणाऱ्या बड्या ग्राहकांकडे वळविला आहे. आतापर्यंत तो लगतच्या तेलंगणा राज्यातील बड्या जुगार प्रेमींपर्यंत पोहोचला होता. तेथील लोक येथे येऊन जुगार खेळत आहेत. आता मात्र त्याने थेट बंगळुरूपर्यंत मजल मारली आहे. येथील बड्या श्रीमंत जुगार प्रेमींना तो आर्वी येथे आणत आहे. हे सर्व होत असताना पोलीस प्रशासन मात्र सोयीस्कररित्या गप्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आहे का? यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिवाळीनंतर जिल्ह्यात कोंबड बाजाराचे जणू पीक आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा अवैध प्रकार सुरू आहे. मात्र, यातील सर्वात मोठा आणि सुसज्ज असा कोंबड बाजार राजुरा तालुक्यातील आर्वी येथे सुरू आहे. एखादी यात्रा वाटावी असे या कोंबड बाजाराचे स्वरूप आहे. या बाजाराचा म्होरक्या गोलू नामक व्यक्ती असल्याची माहिती आहे. त्याला या क्षेत्रातील एका स्थानिक नेत्याचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच पोलीस प्रशासन देखील कारवाई करण्यास पुढे धजावत नाही अशी स्थिती आहे. हा बाजार सांभाळण्यासाठी गोलुने तब्बल 40 लोकांना आपल्या हाताखाली कामाला ठेवले आहे. सोबत काही शाळेकरी मुले देखील येथे निगराणी करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर कोंबड बाजार परिसरात संशयास्पद हालचालींवर देखरेख करून त्याची तत्काळ माहिती देण्याची जबाबदारी आहे.

गोलुच्या कोंबड बाजाराची बंगळुरूपर्यंत मजल....

गुगल पे, फोन पे अशा सर्व अद्यावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. एकाच दिवशी येथे कोंबड्यांच्या तब्बल 70 लढती लढवल्या जातात. त्यासाठी लोखंडी जाळीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे दारूही सर्रास विकली जाते. या कोंबड बाजारात शेकडो लोक येत असतात. दरदिवशी येथे कोट्यवधीची उलाढाल होते. हे एकूणच चित्र धक्कादायक आणि संतापजनक आहे. मात्र पोलीस प्रशासनाने अद्यापही यावर कुठली ठोस कारवाई केली नाही, ही बाब त्याहूनही दुर्दैवी आहे.

दोन लाख दाखवा आणि जुगार खेळा
येथे केवळ कोंबड बाजार नाही मोठ्या प्रमाणात जुगारही खेळला जातो. याचे स्वरूप इतके मोठे आहे की खेळणाऱ्या व्यक्तीला आधी दोन लाखांची रक्कम दाखवावी लागते. नंतरच त्याला जुगार खेळण्याची मुभा आहे. संध्याकाळी पाच वाजतापासून ते मध्यरात्रीपर्यंत हा जुगार चालतो. त्यामुळे संध्याकाळी केवळ चारचाकी वाहनालाच येथे एन्ट्री असते.

जुगार 'सम्राट'च्या ग्राहकांची गोलुकडून शोधाशोध
पुर्वी राजुऱ्यात जुगाराचे एक मोठे रॅकेट सुरू होते. यात एका जुगार 'सम्राटाचे' वर्चस्व होते. त्याच्या लॉनमध्ये हा जुगार भरायचा. यासाठी त्याचे गर्भश्रीमंत ग्राहक तेलंगणापासून तर बंगळुरू येथूनही यायचे. मात्र, तत्कालीन कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी हे रॅकेट ध्वस्त केले. त्यांच्या कारवाईमुळे हा जुगार अड्डा बंद पडला. मात्र, पुढे राजकीय दबावापोटी जाधव यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून या लॉनमधील जुगार बंद पडला. याचा फायदा आता गोलू आपल्यासाठी करून घेत आहे. अशा श्रीमंत ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना तो आपल्या कोंबड बाजारातील जुगार अड्ड्यावर आमंत्रित करीत आहे. यासाठी त्याचे कनेक्शन कर्नाटक राज्यातील बंगळुरूपर्यन्त पोहोचले आहे, अशी माहिती 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागली आहे.

जुगार अड्डा वर्षभर सुरू ठेवण्याची तयारी
साधारणपणे कोंबड बाजार मकर संक्रातीपर्यंत चालतो. कोंबड बाजारातच वेगळा जुगार खेळला जातो. त्यामुळे कोंबड बाजार बंद म्हणजे जुगारही बंद होतो. मात्र, गोलू हा जुगार वर्षभर सुरू ठेवण्याच्या तयारीत आहे. म्हणजे संक्रातीनंतर कोंबड बाजार जरी बंद झाला तरी मात्र हा लाखोंचा जुगार सुरू असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.