चंद्रपूर : शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्याने ( lightning in Vaigaon ) चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची ( Four women died to lightning ) धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील वायगावात आज दुपारी घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. झाडे कुटुंबातील तीन महिला या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे, तर गजभिये कुटुंबातील एका मुलीला आपला प्राण या घटनेत गमवावा लागला. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी ( Farmers Demanded immediate help ) केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक वरोरा शहरापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर वायगाव हे गाव आहे.
विजेच्या गडगडाटासह अचानक पाऊस - आज दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अचानक पावसाला ( Rain with Thunder ) सुरुवात झाली. विजेचा कडकडाट बघून आपल्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी झाडाचा आडोसा घेतला. यात हिरावती शालिक झाडे (वय ४५ वर्ष, राहणार वायगाव ) माजी पंचायत समिती सदस्य, पार्वता रमेश झाडे ( वय ६० वर्ष ), मधुमती सुरेश झाडे ( वय २० वर्ष ), रीना नामदेव गजभे ( वय २० वर्ष ) या चार जणींचा समावेश होता. यावेळी वीज पडल्याने चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती शेगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली असून पोलीस पंचनामासाठी दाखल झाले आहे. एकीकडे जिल्ह्यात सर्वत्र पुराने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी दुःखात आहे, त्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - Weightlifter Sanket Sargar : 'आनंदी आहे, पण निराश देखील', संकेतने सांगितले कसे हुकले सुवर्णपदक