चंद्रपूर Anil Deshmukh On Ajit Pawar : अनिल देशमुख ह्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून म्हणून ते आमच्याबरोबर आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावर अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तेव्हा मी मागेल ते मंत्रिपद देण्याची ऑफर मला पवार गटाकडून होती; मात्र ह्या वयात आणि स्थितीत शरद पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून मी ही ऑफर फेटाळली अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (offer to Anil Deshmukh)
सांगितलं की, बापाला सोडून येऊ शकत नाही: शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अनिल देशमुख आज (शुक्रवारी) चंद्रपूर येथे आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रवादीनं भाजपा बरोबर जाण्यासाठी नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या. यावेळी मी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील तिथे उपस्थित होतो. यावेळी आम्ही कित्येकदा त्यांचं मन वळविण्याचे प्रयत्न केले. शरद पवार साहेबांना सोडून भाजपा बरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. शपथविधी झाला तेव्हा देखील प्रफुल्ल पटेल यांनी मला चारदा फोन केला. मात्र, मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितलं की, आपल्या बापाला सोडून येऊ शकत नाही.
शरद पवार यावर स्पष्टच बोलले: शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं होतं की, भाजपा सोबत जाण्यासाठी अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्याकडे गेले होते. आम्ही पण होतो; मात्र पवार साहेबांनी याला स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत आपण भाजपासोबत जाणार नाही. जर कुणालाही जायचं असेल तर जा; पण आपला पक्ष तिथे जाणार नाही, असं स्पष्ट बजावलं होतं.
पवार गट दिशाभूल करीत आहे: आता अजित पवार गट भाजपा सोबत गेल्यानं त्यांच्या नेत्यांकडून दररोज नवनवे आरोप केले जात आहेत. जनतेची दिशाभूल करण्यासाठी वाटेल ते आरोप केले जात आहेत. यात कोणतंही तथ्य नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांनी राजीनामा दिला असताना स्वतः कार्यकर्त्यांनी याचा विरोध केला होता. यावेळी त्या गटात गेलेले प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील शरद पवार यांची मनधरणी केली होती. आता मात्र जनतेची दिशाभूल करण्यासाठी आधारहीन आरोप केले जात आहेत.
हेही वाचा: