चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी उपवनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या टिटवी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सागवानाची अवैध तोड केली जात असल्याचे आढळून आले. सागवानाची सर्व लाकडे जप्त करण्यात आली.
भिसी उपवनपरिक्षेत्रात सागवानाची अवैध तोड केली जात असल्याची माहिती मिळताच, वनक्षेत्र सहायक वाय. के. दोडके, वनरक्षक व्ही. एस. चंदनखेडे, अमोल झलके, फिरत्या पथकाचे सद्स्य आर. आर. नरळ, के. डी. गायकवाड, जानबा नंदनवार, गजू बुरबांधे आणि दिवाकर डांगे या पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला. यावेळ तेथील सागवानाची लाकडे जप्त करण्यात आली. तसेच याप्रकरणी सागवान ठेकेदाराचा कुठेही उल्लेख केला नाही. तसेच नेहमी कारवाई देखील केली जात नाही. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सागवान ठेकेदार लाकडाची तस्करी करत असल्याचे बोलले जात आहे.