चंद्रपूर : जिल्ह्याला पुराचा पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. तेलंगणा-महाराष्ट्र ( Telangana Maharashtra ) राज्याला जोडणाऱ्या राजुरा पुलावर पाणी असल्याने पुन्हा एकदा हा पूल बंद झाला आहे. चंद्रपूर शहराच्या लगत असणाऱ्या लोकवस्तीतही पाण्याची पातळी वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे पूढील चोवीस तास हे धोक्याचे असणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरजन्य परिस्थिती ( Chandrapur rainfall conditions ) निर्माण झाली होती. इरई धरणाचे पाणी हे चंद्रपूर शहरात घुसले होते. त्यामुळे शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पावसाने उसंत घेतली आणि हळूहळू स्थिती पूर्ववत व्हायला लागली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाली. इरई धरणाचे सातही दारं दीड मीटर उंचीवर उघडण्यात आले. निम्न वर्धा आणि गोसेखुर्द प्रकल्पातुनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांना याचा फटका बसला. सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसला. उमा नदीला आलेल्या पुरामुळे चिमूर शहरात पाणी शिरले तसेच तालुक्यातील इतर गावातही हीच परिस्थिती ओढवली. तर 50 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आता स्थिती सामान्य होत असली तरी अजूनही धोका कायम आहे. बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पुलावर वर्धा नदीचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर शहरातील बिनबा गेट ( Binba Gate in Chandrapur City ) जवळील पुलावरून देखील पाणी वाहू लागले आहे. रेहमत नगर आणि सिस्टर कॉलनी या परिसरातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
या पूर्वी जिल्ह्यातील पूरस्थिती (MH Chandrapur Flood Situation) पूर्ववत होत असतानाच मागील चोवीस तासात मुसळधार पावसाची (Heavy Rains) नोंद झाल्याने, पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला होता. जिल्ह्यातील मूल, सावली येथे अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. चिमूर शहरासह तालुक्यातील अनेक गावाला पुराने वेढले असून बचाव कार्य सुरू केले होते. सध्या तालुक्यातील स्थिती सामान्य होत असली तरी पुढील चोवीस तास धोक्याचे असणार आहे. इरई धरणाचे (Erai Dam) सातही दारं दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. तसेच निम्न वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सोबत नजीकच्या तेलंगणा राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जर पुढील चोवीस तासांत मुसळधार पाऊस कोसळला तर याचा मोठा फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसणार असा इशारा देण्यात आला होता.
हेही वाचा : MH Chandrapur Flood Situation: चिमूर तालुक्याला पुराचा फटका; इरई धरणाचे सातही दारं उघडले; तूर्तास धोका