ETV Bharat / state

चंद्रपुरात अंधश्रद्धेचा कळस; गुप्तधन मिळवण्यासाठी सुशिक्षीत कुटुंबीयांकडून नववधूचा छळ

गुजगाव येथील मांत्रिक अरुण दहेकरच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार सुरू होता. तुमच्या घरात गुप्तधन आहे. यासाठी मांत्रिक नववधूकडून हे सर्व विधी पूर्ण करण्यास सांगायचा. त्यानुसार कुटुंबीय तिचा मानसिक, शारीरिक छळ करत होते.

फाईल फोटो
author img

By

Published : Jul 10, 2019, 5:09 PM IST

Updated : Jul 10, 2019, 8:32 PM IST

चंद्रपूर - गुप्तधन मिळवण्यासाठी एका सुशिक्षीत कुटुंबियांकडून नववधूचा शारीरिक, मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील सावरी गावात राजकीय वजन असलेल्या कुटुंबात तब्बल ५० दिवस नववधूने मरयातना सहन केल्या. मात्र, तिने अन्यायाला वाचा फोडली. त्यावरून तिचा पती, सासू सासरे आणि मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेल्या घटनेबद्दल माहिती सांगताना पीडिता, तिचे नातेवाईक आणि पोलीस अधिकारी

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मुकेश वाघाडे यांची मुलगी सविताचा विवाह १९ ऑगस्ट २०१८ ला चिमूर तालुक्यातील सावरी येथील समीर गुणवंत कोरेकार याच्याशी झाला. समीर हा कृषी क्षेत्रात उच्चशिक्षित आहे. शासकीय नोकरी सोडून तो कृषी केंद्र चालवतो. त्याचे वडील कृषी अधिकारी होते. कोरेकार कुटुंबाचे या परिसरात राजकीय वजन आहे, तर सविताचे वडील मुकेश वाघाडे जिल्हा परिषदेचे माजी सद्स्य आहेत. आपल्या बरोबरीच्या घराण्यासोबत विवाह झाल्यामुळे आपली मुलगी येथे गुण्यागोविंदाने नांदणार अशी त्यांची भाबडी आशा होती. मात्र, लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून सविताचा छळ झाला. तिला रात्री दोन वाजता झोपेतून उठवण्यात आले. घराला लागूनच असलेल्या दर्ग्याची स्वच्छता करण्याचे तिला सांगण्यात आले. यानंतर घरात ठेवण्यात आलेला कासव काढण्यात आला. याची अंघोळ घालण्यास तिला सांगण्यात आले. याचवेळी तिचा पती समीर कोरेकार याच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला. हे सर्व पाहून सविता चक्रावून गेली. यादिवशी पासूनच तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला.

सविताला दररोज तब्बल १२ तास उपाशी ठेवण्यात येत होते. पूजापाठ आणि आणखी काही विधी करण्यात काही चूक झाल्यास तिला जबर मारहाण करण्यात येत होती. घराच्या चार भिंतीच्या आत हा सगळा प्रकार सुरू होता. याबद्दल गावकऱ्यांना कल्पना देखील नव्हती. याबाबत कुणालाही माहिती होऊ नये यासाठी सविताचा मोबाईल देखील हिरावून घेण्यात आला. तिला वडिलाशी बोलायचे असल्यास सासूच्या मोबाईलमधून बोलावे लागत होते. सासू विमालाबाई तिचा हात धरून तिचे सर्व संभाषण ऐकत असायची. त्यामुळे तिच्यावर होत असलेला अत्याचार मुकाट्याने सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.

गुजगाव येथील मांत्रिक अरुण दहेकरच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार सुरू होता. तुमच्या घरात गुप्तधन आहे. यासाठी मांत्रिक नववधूकडून हे सर्व विधी पूर्ण करण्यास सांगायचा. कोरेकार कुटुंबीय यासाठी सविताचा छळ करत होते. यापूर्वीदेखील समीरचे लग्न झाले होते. या छळाला कंटाळून पहिल्या पत्नीने अवघ्या काही दिवसात पलायन केले. ही बाब सविताला कळली. त्यानंतर एके दिवशी तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले असता तिने वडिलांसोबत माहेरी येण्याची विनंती केली. यानंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत सांगितली आणि एक धक्कादायक सत्य समोर आले. या प्रकरणात शेगाव पोलीस ठाण्यात सविताचा पती समीर कोरेकार, सासरा गुणवंत कोरेकार, सासू विमल कोरेकार आणि मांत्रिक अरुण दहेकर यांच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:चंद्रपूर : अंधश्रद्धा ही केवळ अशिक्षित लोकांतच नाही तर सुशिक्षित लोकांमध्ये ही विकृती बघायला मिळते याचे धक्कादायक उदाहरण चिमूर तालुक्यातील सावरी या गावात बघायला मिळाले. येथे एक राजकीय वजन असलेल्या सुशिक्षित कुटुंबात हा प्रकार सुरू होता. गुप्तधन मिळविण्यासाठी या कुटुंबातील नववधूचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. तब्बल 50 दिवस या नववधूने आपल्या सासरच्यांकडून मरणयातना सहन केल्या. अखेर सासरच्यांच्या तावडीतून सुटका करून या नववधूने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात तिचा पती, सासू सासरे आणि मंत्रिकावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Body:गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मुकेश वाघाडे यांची मुलगी सविता हिचा विवाह 19 ऑगस्ट 2018 ला चिमूर तालुक्यातील सावरी येथील समीर गुणवंत कारेकार याच्याशी झाला. समीर हा कृषी क्षेत्रात उच्चशिक्षित आहे. शासकीय नोकरी सोडून तो कृषी केंद्र चालवितो. त्याचे वडील हे सुद्धा कृषी अधिकारी होते. कारेकर कुटुंबाचे या परिसरात राजकीय वजन आहे. तर सविताचे वडील मुकेश वाघाडे हे सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. आपल्या बरोबरीच्या घराण्यासोबत विवाह झाल्यामुळे आपली मुलगी येथे गुण्यागोविंदाने नांदणार अशी त्यांची भाबडी आशा होती. मात्र, लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून सविताचा छळ झाला. तिला रात्री दोन वाजता झोपेतून उठविण्यात आले. घराला लागूनच असलेल्या दर्ग्याची स्वच्छता करण्याचे तिला सांगण्यात आले. यानंतर घरात ठेवण्यात आलेला कासव काढण्यात आला. याची अंघोळ घालण्यास तिला सांगण्यात आले. याच वेळी तिचा पती समीर कोरेकार याच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला. हे सर्व पाहून सविता चक्रावून गेली. यादिवशी पासूनच तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला. तिला दररोज तब्बल 12 तास उपाशी ठेवण्यात येत होते. पूजापाठ आणि आणखी काही विधी करण्यात काही चूक झाल्यास तिला जबर मारहाण करण्यात येत होती. घराच्या चार भिंतीच्या आत हा सगळा प्रकार सुरू होता. ज्याची गावकऱ्यांना देखील कल्पना नव्हती. ही बाब बाहेर जाऊ नये म्हणून सविताचा मोबाईल देखील हिरावून घेण्यात आला. तिला वडिलाशी बोलायचे असल्यास सासूच्या मोबाईलमधून बोलावे लागत होते. सासू विमालाबाई ही तिचा हात धरून तिचे सर्व संभाषण ऐकत असायची. त्यामुळे आपल्यावर होत असलेला अत्याचार मुकाट्याने सहन करण्याशिवाय सवितीसमोर पर्याय नव्हता. गुजगाव येथील मांत्रिक अरुण दहेकर याच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार सुरू होता. तुमच्या घरात गुप्तधन आहे. यासाठी नववधूकडून हे सर्व विधी पूर्ण करण्याचे तो सांगण्यात होता. कोरेकार कुटुंबीय यासाठी सविताचा छळ करीत होते. यापूर्वी देखील समीरचे लग्न झाले होते. या छळाला कंटाळून अवघ्या काही दिवसात पलायन केले. ही बाब सविताला कळली. एक दिवशी तिचे वडील तिची भेट घेण्याकरिता आले असता तिने वडिलांसोबत येण्याची विनंती केली. यानंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत सांगितली आणि एक धक्कादायक सत्य समोर आले. या प्रकरणात शेगाव पोलिस ठाण्यात सविताचा पती समीर कोरेकार, सासरा गुणवंत कोरेकार, सासू विमल कोरेकार आणि मांत्रिक अरुण दहेकर यांच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा 2013 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.