चिमूर (चंद्रपूर) - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही करून चिमूर नगरपरिषदेने १ एफ्रिलपासुन तर २० मे पर्यंत ७८ हजार ४०० रुपयांच्या दंडाची रक्कम वसुल केली. दोन किराणा दुकानांना १० दिवसांकरीता सील लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
नगरपरिषदेची दंडात्मक कार्यवाही :
चिमूर नगरपरिषदेतर्फे सार्वजनिक स्थळी बिना मास्क फिरणाऱ्या २६१ व्यक्तीकडून ५२ हजार रुपये दंडाची वसुली केली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मिलन मंगल कार्यालयाकडून ५ हजार रुपये दंड आकारला. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकानदारांनी ग्राहकाना जमवून व्यवसाय केल्याबद्दल चार दुकानांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारून २० हजार रुपये वसुल केले. सार्वजनिकस्थळी थुंकणाऱ्या ७ व्यक्तींकडून १४०० रुपये दंड वसुली केली. अशा प्रकारे एकूण ७८ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली. निर्धारीत वेळेत दुकान बंद न करणारे तथा नगरपरिषदेने आकारलेले दंड न भरणाऱ्या असावा किराणा स्टोअर्स तथा निखील किराणा स्टोअर्सवर २१ मे पासून तर १ जूनपर्यंतच्या कालावधीकरीता सील करण्यात आले. तर कठाणे किराणा स्टोअर्स, शरद गुप्ता हॉर्डवेअर तथा ताज किराणा स्टोअर्स विरोधात दंडात्मक कार्यवाही केली.
यांनी केली कार्यवाही :
सदर कार्यवाही उप विभागीय अधिकारी तथा चिमूर नगरपरिषदेचे प्रशासक प्रकाश संकपाळ, प्रभारी मुख्याधिकारी गजानण भोयर यांचे मार्गदर्शनात कार्यवाही पथक प्रमुख राहुल रणदिवे, हेमंत राहुलवार, मिनाज शेख, घनश्याम उईके, प्रवीण कारेकार, ताराचंद आठवले, अभय शेंबेकर इत्यादी कर्मचाऱ्यांनी केली.