ETV Bharat / state

बाप-मुलीच्या नात्याला काळिमा, पोटच्या मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार - मुली

नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नराधम पित्याने आपल्या पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पोटच्या मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:16 PM IST

Updated : Jul 28, 2019, 11:34 PM IST

चंद्रपुर - बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. एक नराधम बाप आपल्या पोटच्या मुलींवर काही दिवसांपासून अत्याचार करीत होता. विशेष म्हणजे हा नराधम बाप माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. नागभीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

police station nagbheed
नराधम बापाकडून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा

नराधम बापाकडून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा

आरोपी हा माजी जिल्हा परिषद सदस्य असून तो नवरगाव येथे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पत्नीशी पटत नसल्याने पत्नी तो विभक्त राहत होते. त्याच्या दोन मुली या त्याच्या सोबतच राहत होत्या. त्यातील एक मुलगी १७ वर्षांची तर दुसरी १४ वर्षांची आहे. या दोन्ही मुलींवर हा नराधम बाप काही दिवसांपासून अत्याचार करीत होता. हा अत्याचार असह्य झाल्याने अखेर मुलींनी आपली तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जात असल्याचे सांगत घरातून पळ काढला. त्यानंतर थेट आपल्या मामाकडे जाऊन त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. या मुलींना घेऊन मामाने नागभीड पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Intro:चंद्रपुर : नराधम बाप पोटच्या मुलींवर अत्याचार करीत असल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. विशेष म्हणजे हा नराधम बाप माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. नागभीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी हा माजी जिल्हा परिषद सदस्य असून तो नवरगाव येथे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पत्नीशी पटत नसल्याने पत्नी त्याच्याशी विभक्त राहत होती. तर त्याच्या दोन मुली ह्या त्याच्याच सोबत राहत होत्या. त्यातील एक मुलगी 17 वर्षांची तर एक 14 वर्षांची आहे. या दोन्ही मुलींवरह नराधम बाप अत्याचार करीत होता. हा अत्याचार असह्य झाल्याने अखेर आज मुलींनी आपली तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जात असल्याचे सांगत पळ काढला. त्यांनी थेट आपल्या मामाकडे जाऊन ही सर्व हकीकत सांगितली. या मुलींना घेऊन मामाने नागभीड पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार केली. याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.त्यावर पोलिसांनी भादवी कलम 354, 376 आणि 506 तसेच पाक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:.Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.