ETV Bharat / state

बोगस बियाणामुळे चंद्रपूरमधील भातपीक उत्पादक शेतकरी अडचणीत - धान उत्पादक शेतकरी अडचणीत

गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केशर नावाच्या भातपिकाची लागवड केली होती. हे बियाणे महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाचे असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले होते.

chandrpur
बोगस धानाच्या बियाणामुळे चंद्रपूरमधील धान उत्पादक शेतकरी अडचणीत
author img

By

Published : Jan 6, 2020, 3:27 PM IST

चंद्रपूर - उच्च दर्जाच्या तांदळाच्या बियाणाची लागवड केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. या बियाणापासून निघालेल्या तांदळाला बाजारात कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे तांदूळ घरी पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू गाळण्याशिवाय पर्याय नाही.

बोगस बियाणामुळे चंद्रपूरमधील भातपीक उत्पादक शेतकरी अडचणीत

हेही वाचा - मुकबधीर शाळा झाली स्मार्ट; हावभाव भाषा विकास तंत्राचे चंद्रपूरमध्ये उद्घाटन

पूर्व विदर्भ हा भातपीकाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. बाजारात नवीन आणि उच्च दर्जाच्या भातपिकाच्या जातींचे शेतकरी लागवड करून उत्पन्न घेत आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने भातपीक उत्पादक शेतकऱ्यांनी भातपिकाची लागवड केली होती. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केशर नावाच्या भातपिकाची लागवड केली होती. हे बियाणे महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाचे असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले होते. हे भातपीक बारीक असल्याने बाजारात त्याला मोठया प्रमाणात किंमत येईल आणि आपल्याला थोडाफार फायदा होईल. या आशेने अनेक शेतकऱ्यांनी या भातपिकाची लागवड केली. जड तांदळाला सामान्य तांदळापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते.

हेही वाचा - स्वार्थाची सत्ता! वडेट्टीवारांच्या वाढदिवसाचा पडला होता विसर, मंत्री होताच शहरभर फलकांचा महापूर

शेतकऱ्यांनी सतत ३ महिने मेहनत घेतली. पण प्रत्यक्षात जेव्हा पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण निघालेला तांदूळ हा जाड होता. त्यांनी अधिकची चौकशी केली असता हे भातपिकाचे बियाणे तेलंगणातील असल्याचे समजले. हा तांदूळ तेलंगणातील असल्यामुळे बाजारात व्यापारी हा तांदूळ घ्यायला तयार नाही. तांदूळ जाड असून याला भाव मिळणार नाही. म्हणून बाजार समितीनेही हात वर केले आहेत. त्यामुळे मेहनतीने घेतलेले भातपिकाचे पीक घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील एकट्या धानापूर गावात साधारणत: वीस ते तीस शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत.

फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांना आता न्याय मिळणार का? हा प्रश्न आहे. उत्कृष्ठ बियाणे म्हणून विक्री करताना निकृष्ट धानाचे उत्पादन झाल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता समोर येत आहे. गरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणाची तातडीने चैकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Intro:रोवली महाराश्ट्रातील बियाणे.... निघाल तेलंगणातील नित्कृष्ठ धान

चंद्रपूर

बिजाई रोवली महाराष्ट्रातील उच्च प्रतीच्या तांदळाची पण प्रत्यक्षात पिक निघाल ते तेलंगणातील नित्कृष्ट धानाच.बाजारात हा धान कुणी घ्यायला तयार नाही.धान बघताच बाजार समितीनेही हात झटकले.घरी लाख रूपयाचे धान आहेत.पण बंदिस्त पिकाकडे बघत आसव ढाळण्याशिवाय पर्यायच नाही.संताप काढावा तरी कुणावर हा विषय आहे.राज्यात ठाकरे सरकार शेतक-यांच सरकार आहे.ते तरी आपणास न्याय देणार का.....या आशेच्या प्रश्नावर ते आहेत.
पुुर्व विदर्भ हा धानपटटयाचा म्हणून प्रचलित आहे.नवनवीन धानाच्या बिजाई आल्या.अनं विविध प्रकारच्या व्हेरायटीच्या धानाचे शेतकरी उत्पन्न घेउ लागले.यंदा चांगल्या पावसाचा अंदाज होता.अन तो खराही ठरला.यासाठी धानउत्पादक शेतक-यांनी तयारी केली.गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातील अनेक शेतक-यांनी यावेळी केशर नावाच्या धानाची बिजाई रोवली.हि बिजाई महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाची असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले.हा जड धान व बारीक असल्याने बाजारात त्याला मोठया प्रमाणात किंमत येईल.व आपल्याला थोडाफार फायदा होईल.या आशेन अनेक शेतक-यान याच धानाची बिजाई रोवली.जड धानाला सामान्य धानापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.पाणीही जरा जास्त लागते.अशात शेतक-यांनी सतत तिन महिने पं्रचड मेहनत घेतली.पण प्रत्यक्षात जेव्हा धानाच पिक निघाल तेव्हा त्यांना प्रचंड धक्काच बसला.कारण निघालेला तांदुळ हा ठोकळ होता.त्यांनी अधिकची चैकशी केली असता हि धानाची बिजाई तेलंगणातील निघाली.यामुळे लावला महाराष्ट्रातील उच्च दर्जाचा धान अनं उत्पन्न निघाल ते तेलंगणातील नित्कृष्ट तांदळाच.....!बाजारात धान विकायला गेल तर व्यापारी घ्यायला तयार नाही.धान तेलंगणातील आहे.व तो ठोकळ आहे याला भाव मिळणार नाही म्हणून बाजार समितीनेही हात वर केले.अशात प्रचंड मेहनतीन घेतलेल धानाच पिक आपल्याच घरात ठेवण्याची पाळी शेतक-यावर आली आहे.गोंडपिपरी तालुक्यातील एकटया धानापूर गावात साधारणत विस ते तीस शेतक-यांवर हि आफत ओढावली आहे.गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्यातही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत.
या शेतक-याना न्याय मिळणार का हा प्रश्न आहे.उत्कृष्ठ बियाणे म्हणून विक्री करतांना नित्कृष धानाचे उत्पादन झाल्याने या संपुर्ण प्रकाराची चैकशी करण्याची मागणी आता समाररे येत आहे.
गरीब शेतक-यांना फसविण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे.याप्रकरणाची तातडीने चैकशी करावी. व दोषींवर कार्यवाही करावी.विविध संकटानी ग्रस्त असलेल्या या शेतक-यांना तातडीने न्याय दयावा
सुरज माडूरवार,अध्यक्ष रायुकाॅ,गोंडपिपरीBody:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.