ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये मासोळ्यांनी तारले; महिनाभरात लाखोंची उलाढाल - चंद्रपूर कोरोना

आपल्या सव्वादोन एकर शेतीत असलेल्या तीन मच्छीखड्यातून गेल्या महिनाभरात तब्बल तीन लाख रूपयांची मच्छीविक्री केली. कोरोनाचे खापर कोंबडीवर फुटल्याने मासोळ्यांना बाजारात मोठी मागणी आहे. याचा फायदा शेतकऱ्याला झाला. सकमूर गावातील अशोक रेचनकर या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

लॉकडाऊनमध्ये मासोळ्यांनी तारले; महिनाभरात लाखोंची उलाढाल

author img

By

Published : Apr 26, 2020, 6:22 PM IST

चंद्रपूर - कोरोना विषाणूने धावणारे जग थांबले. देशात लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये उद्योग धंदे ठप्प पडले आहेत. अशात गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील एका शेतकऱ्याने मत्स्यपालनातून आपली शेती फुलविली. आपल्या सव्वादोन एकर शेतीत असलेल्या तीन मच्छीखड्यातून गेल्या महिनाभरात तब्बल तीन लाख रूपयांची मच्छीविक्री केली. कोरोनाचे खापर कोंबडीवर फुटल्याने मासोळ्यांना बाजारात मोठी मागणी आहे. याचा फायदा शेतकऱ्याला झाला. सकमूर गावातील अशोक रेचनकर या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

लॉकडाऊनमध्ये मासोळ्यांनी तारले; महिनाभरात लाखोंची उलाढाल

गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील अशोक रेचनकर यांची गुजरी गावालगत पंधरा एकर शेती आहे. पूर्वी ते या शेतात पारंपारिक पीक घेत होते. पण शेताच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करण्याचे त्यांनी नियोजन केले. मागील वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात पंधरा एकर शेतीपैकी सव्वा दोन एकर शेतात त्यांनी तीन मच्छीखड्डे तयार केले. मोटारपंपाच्या साहाय्याने नदीतील पाणी मच्छीखड्यात सोडण्यात आले. यानंतर छत्तीसगड व कलकत्ता येथून झरण व छिलटेवाली अशा एकूण 40,000 मत्सबिजाई टाकण्यात आली. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात हे मासे पाऊन-एक किलो वजनाचे झाले. ऐन विक्रीसाठी मासे तयार होत असताना कोरोनाचे सावट आले. या संकटकाळाशी मुकाबला करण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला अन् सारंच थांबलं.

पहिल्यांदाच हा प्रयोग करणाऱ्या अशोक रेचनकर यांनाही या लॉकडाऊनची धास्ती वाटली. कोरोनामुळे लोकांनी चिकन, मटण खाणे कमी केले अन् मच्छीला पसंती देऊ लागले. लाॉकडाऊनपासून त्यांनी आतापर्यत तब्बल तीन लाख रूपयाचे मासे विकले आहेत. रविवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारी ते आपल्या शेतातून मासे विकतात. बाजारात दोनशे ते अडीचशे रूपये किलोला मिळणारी मच्छी रेचनकर यांच्या शेतात झरण 120 रूपये किलो तर छिलटेवाली 160 रूपये किलो या स्वस्त दरात मिळते. सकमूर येथील शेतकऱ्यांने मच्छीखड्ड्याचा प्रयोग केल्याची माहिती मिळताच आता मच्छीव्यापारीही रेचनकर यांच्या शेतात मच्छी घेण्यासाठी येऊ लागले आहेत. सव्वादोन एकराचा मच्छीखड्डा, मच्छीखाद्य व संबंधित बाबींसाठी रेचनकर यांना जवळपास चार लाख रूपये खर्च आला आहे. या खड्ड्यातील मच्छीतून जवळपास सात ते आठ लाख रूपयांचे उत्पन्न निघेलच, असा विश्वास अशोक रेचनकर यांना आहे.

सकमूरसारख्या ग्रामीण भागात अशोक रेचनकर यांनी केलेल्या मत्स्यपालनाची शेती अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अशोक रेचनकर यांची पंधरा एकर शेती रस्त्याच्या आमनेसामने आहे. रस्त्याच्या त्या बाजूला मत्स्यपालन तर समोरील बाजूस गोट फार्म, पोल्ट्री फार्मचा व्यवसाय ते करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.