ETV Bharat / state

Cancer Hospital in Chandrapur : कर्करुग्णांच्या संख्येत दुसरा क्रमांक असलेल्या चंद्रपुरात टाटाचे 'किमोथेरपी' सुरू; 'असे' होणार उपचार - Cancer Hospital in Chandrapur

जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना नागपुरात जावे लागत होते. यासाठी त्यांना मोठा खर्च लागत होता. ही असुविधा टाळण्यासाठी नुकतेच जिल्ह्यात कर्करोग केंद्र ( chemotherapy center in Chandrapur ) सुरू करण्यात आले. या केंद्राच्या तांत्रिक बाबीबाबत ओंकॉलॉजिस्ट (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. गोपीचंद वरटकर ( Dr Gopichand waratkar on Cancer treatment ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना प्रकाश टाकला.

डॉ. गोपीचंद वरटकर
डॉ. गोपीचंद वरटकर
author img

By

Published : Feb 12, 2022, 7:21 PM IST

Updated : Feb 12, 2022, 7:44 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा कर्करोग रुग्णांच्या संख्येत राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय ( Chandrapur Cancer Hospital ) उभारण्यात आले आहे. ते लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी रुग्णांना सुविधा मिळावी, यासाठी किमोथेरपी केंद्र उघडण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना नागपुरात जावे लागत होते. यासाठी त्यांना मोठा खर्च लागत होता. ही असुविधा टाळण्यासाठी नुकतेच जिल्ह्यात कर्करोग केंद्र ( chemotherapy center in Chandrapur ) सुरू करण्यात आले. या केंद्राच्या तांत्रिक बाबीबाबत ओंकॉलॉजिस्ट (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. गोपीचंद वरटकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना प्रकाश टाकला.

कर्करोगाचे निदान करणे आता सोपे

हेही वाचा-Raid on CAs House in Nagpur : नागपुरातील सीएच्या घरात केंद्रीय तपास यंत्रणेची धाड; अनिल देशमुख यांच्या शिक्षण संस्थेची संबंधित सांभाळायचे कामकाज

काय आहे किमोथेरपी?
किमोथेरपी ही तीन प्रकारची असते. प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह आणि पॅलेटिव्ह. पहिल्या प्रकारात रुग्णाची गाठ मोठी असल्यास शस्त्रक्रिया केली जाऊ शकत नाही. अशावेळी किमोथेरपीने ही गाठ आधी छोटी केली जाते. यानंतर त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. दुसऱ्या प्रकारात शरीरातील छोट्या गाठी नष्ट केल्या जातात. तिसऱ्या प्रकारात कमोथेरपी दिली जाते. त्यामुळे रुग्णाचे आयुष्यमान वाढते.

हेही वाचा-निवडणुका असलेल्या राज्यात महाराष्ट्राच्या खतांचा साठा केंद्राने वळवला- कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा आरोप

काय आहे बायोसेप्टिक कॅबिनेट?
केमोथेरपीच्या औषधीमध्ये सायटोटॉक्सिक असते. सामान्य व्यक्तीसाठी ही अत्यंत घातक आहे. त्याचा संपर्कदेखील धोकादायक असू शकतो. ही औषधी वातावरणात पसरल्याने देखील धोका होऊ शकतो. त्यामुळे हे औषध उपचारासाठी तयार करताना ते बायोसेप्टिक कॅबिनेटमध्ये ही प्रक्रिया केली जाते. त्यात एक काचेचे आवरण असते. तसेच बाहेर दोन फिल्टर लावले असतात. यानंतर यातील हवा बाहेर जाते. ही मशीन हाताळणीसाठी टाटा ट्रस्टच्यावतीने परिचारिकांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

किओसच्या माध्यमातून रुग्णांचे निदान?
जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांचे निदान लवकर व्हावे, यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून किओसची एक टीम तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबीर भरवले जातात. रुग्णांची माहिती घेऊन त्यांची योग्य तपासणी केली जाते. या माध्यमातून कर्करोगाचे निदान करणे आता सोपे झाले आहे.

हेही वाचा-Road Romeo Slapped Belt : रोड रोमियोला छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने दिला पट्ट्याने चोप; पाहा व्हिडिओ

वाढत्या प्रदूषणामूळे कर्करोगाच्या रुग्णांत वाढ?
चंद्रपूर जिल्हा हा सर्वात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे असलेल्या कोळसा खाणी, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, सिमेंट उद्योग, पोलाद उद्योग हे उद्योग प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या चंद्रपुरात आहे.

अशी आहे सुविधा
या ठिकाणी अत्याधुनिक साहित्यांसह 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. डे-केअर सेंटरमध्ये लागणारी सर्व प्रकारची औषधी, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमीनर फ्लो व मल्टिपॅराचा प्रामुख्याने समावेश आहे. किमोथेरपीचे सायकल असतात. कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते. त्यामुळे 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आल्याचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गोपीचंद वरटकर यांनी सांगितले.

Last Updated : Feb 12, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.