चंद्रपूर: ज्या बाबासाहेबांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला मानवी हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्याच बाबासाहेबांच्या DR Babasaheb Ambedkar नावावर उघडण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणूक Discriminatory treatment students दिली जाते, असा गंभीर आणि असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. चंद्रपुरातील बार्टी प्रशिक्षण केंद्रातील हा प्रकार आहे. यात विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे मानधन जाणीवपूर्वक रोखले जाते, असा गंभीर आरोप या केंद्राच्या विद्यार्थ्यांनी Student Allegations लावला आहे. यापूर्वी झालेल्या प्रशिक्षण वर्गातील 150 पैकी तब्बल 35 विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून त्यांचे मानधन रोखण्यात आले आहे.
गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला मागील काही काळापासून गैरप्रकार आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणांबाबत सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या वादग्रस्त युक्ती मल्टिपर्पज सोसायटीशी संबंधित हा प्रकार आहे. या माध्यमातून बार्टीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जाणीवपुर्वक मानधन रोखण्यात आल्याचा धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांनी लावला आहे. हजेरी घेणाऱ्या मशीनमध्ये घोळ करून आमची गैरहजेरी दाखविण्यात आली, तर काही मुले जी सातत्याने गैरहजर होती. अशा मुलांची मानधन काढण्यात आली आहेत. आपल्या मर्जीतील विद्यार्थ्यांचे मानधन काढण्यात आले आणि व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन रोखण्यात आले, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून बार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ चौकशी करणे आवश्यक झाले आहे.
केंद्राबाबत अनेक तक्रारी बार्टीला करण्यात आले अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या बार्टी (बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट) च्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच यासाठी त्यांना प्रति महिना 6 हजार असा प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. चंद्रपुरात हे केंद्र युक्ती मल्टिपर्पज सोसायटीला देण्यात आले आहे. नागपुरात देखील ही संस्था बार्टीचे एक केंद्र सांभाळते. मात्र येथील केंद्राबाबत अनेक तक्रारी बार्टीला करण्यात आलेल्या आहेत. त्यातच चंद्रपुरात देखील एक नवा प्रकार समोर आलेला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट या सहा महिन्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या जवळपास 35 विद्यार्थ्यांचे मानधन त्यांना गैरहजर दाखवून जाणीवपुर्वक रोखण्यात आले असा गंभीर आरोप होतो आहे.
75 टक्केहून अधिक हजेरी विद्यार्थ्यांना मानधनास पात्र असण्यासाठी 75 टक्केहून अधिक हजेरी आवश्यक आहे. अतिमहत्त्वाचे कारण असल्यास पूर्वसूचना देऊन विद्यार्थ्यांना सुट्टी घेता येते. मात्र जे विद्यार्थी व्यवस्थापनाच्या मर्जीनुसार वागत नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी पूर्वसूचना देऊन देखील त्यांना गैरहजर दाखविण्यात आले. त्यांना बायोमेट्रिक मशीन वापरण्यास मज्जाव करण्यात आला, तर मर्जीने वागणाऱ्या विद्यार्थी गैरहजर असताना त्यांना हजर दाखवून त्यांचे मानधन काढण्यात आले, असा आरोप मानधन न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
कार्यक्रमाचे पैसे देखील विद्यार्थ्यांकडून ? बार्टी या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचा निधी हा शासनाकडून येतो. मात्र, विद्यार्थ्यांकडून शुल्काच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात, असा आरोप देखील ईटीव्ही भारतशी बोलताना विद्यार्थ्यांनी केलेला आहे.
यामागे षड्यंत्र : संचालिका नगरकर मात्र युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालिका अनुपमा नगरकर- भुजाडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजना बंद व्हावे, म्हणून या विद्यार्थ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
बार्टीची पार्टी आणि मानधन रोखले ? पार्टीच्या संचालिका अनुपमा नगरकर यांची मर्जी न राखणाऱ्या विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक दबाव आणून कारवाई केली जाते. त्यांना नाहक त्रास दिला जातो. नुकत्याच पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होणार होता. नगरकर यांनी तो समारंभ जिल्हा क्रीडा संकुल जवळील असलेल्या विकास केंद्रात घेण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. मात्र ही इमारत पळीत असल्याने आणि जिर्ण झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा समारंभ स्वखर्चाने एका हॉटेलमध्ये पार पडला. यामुळे नगरकर कमालीच्या नाराज झाल्या आणि यात सामील असलेल्या विद्यार्थ्यांचे मानधन रोखले, अशी चर्चा पीडित विद्यार्थ्यांमध्ये आहे.
बार्टीकडून चौकशी कधी होणार ? बाबासाहेबांनी शिकवण दिलेला अनुसूचित सुचित समाज सक्षम व्हावा. यासाठी बार्टीची स्थापना करण्यात आली. मात्र, केवळ मर्जी राखण्याच्या नावावर विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणून देऊन त्यांच्यावर अन्याय होत असेल. बार्टीच्या उद्देशावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणारी ही बाब आहे. आता या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन चौकशी करतील का ? असा सर्वात मोठा प्रश्न आता पीडित विद्यार्थ्यांसमोर उभा टाकला आहे.