ETV Bharat / state

चंद्रपुरातील दारूबंदी तातडीने हटवा, युवा कार्यकर्त्यांची जयंत पाटलांकडे मागणी

author img

By

Published : Feb 6, 2020, 11:39 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तातडीने हटवा अशी मागणी जयंत पाटील यांच्याकडे सुरज माडूरवार यांनी केली आहे. दारू बंदीमुळे विदारक परस्थिती दिसून येत असल्याचे माडूरवार यांनी सांगीतले.

demand-for-jayant-patil-to-remove-liquor-ban-in-chandrapur
चंद्रपूरातील दारूबंदी तातडीने हटवा, युवा कार्यकत्यांची जयंत पाटील यांच्याकडे मागणी

चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. याला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, याचे अतिशय विदारक परिणाम दिसून येत आहेत. कॉलेजकुमारांच्या बॅगमध्ये पुस्तकाऐवजी दारूने जागा घेतली आहे. गल्ल्यागल्यात दारूविक्री सुरू आहे. दारूबंदीमुळे शासनाचा कोटी रूपयाचा महसूल बुडत असला तरी जिल्ह्यात हजारो दारूतस्कर निर्माण झाले आहेत. ही विदारक परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूरची दारूबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी गोंडपिपरीचे युवा कार्यकर्ते सुरज माडूरवार यांनी केली. चंद्रपूर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले होते. त्यावेळी अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह माडूरवार यांनी जयंत पाटील यांना निवेदन देत ही मागणी केली.

चार वर्षात चंद्रपूरच्या दारूबदीने जिल्ह्यातील सामान्य वातावरण अस्वस्थ केलय. गावागावात दारूतस्कर तर निर्माण झाले आहेत. मात्र कॉलेजकुमारही दारूविक्रीच्या भानगडीत पडले आहेत. जिल्ह्यातील गावागावात दारूविक्री सुरू आहे. तिप्पट, चौपट जादा भावाने ही दारूविक्री करण्यात येत आहे. त्यामुळे कामगार व कष्टकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा फटका बसत आहे.

दारूबंदीने एका पोलीस अधिकाऱ्यासह एका पोलिसाचाही बळी घेतला. तरूण पिढी दारूला पर्याय म्हणून ड्रग्सच्या आहारी गेली आहे. गेल्या चार वर्षात दारूबंदीमुळे अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे सुरज माडूरवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही अवस्था लक्षात घेता कामगारांच्या जिल्ह्यातील दारूबंदी तातडीने उठविण्याची मागणी त्यांनी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज चंद्रपुरात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेत निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

Intro:चंद्रपूरातील दारूबंदी तातडीने हटवा
युवा कार्यकत्यांची ना.जयंत पाटील यांच्याकडे मागणी
चंद्रपूर

जिल्हयात दारूबंदी करण्यात आली.चार वर्ष पुर्ण झालीत.पण याचे अतिशय विदारक परिणाम दिसून आले.काॅलेजकुमारांच्या बॅगमध्ये पुस्तकाऐवजी दारूने जागा घेतली.गल्ल्यागल्यात दारूविक्री सुरू आहे.दारूबंदीमुळे शासनाचा कोटी रूपयाचा महसूल बुडत असला तरी जिल्हयात हजारो दारूतस्कर निर्माण झाले आहेत.हि विदारक परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूरची दारूबंदी तातडीने उठवावी अशी मागणी गोंडपिपरीचे युवा कार्यकर्तेे सुरज माडूरवार यांनी केली.आज चंद्रपूर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले होते.त्यावेळी अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह माडूरवार यांनी जयंत पाटील यांना निवेदन देत हि मागणी केली.
गेल्या चार वर्षात चंद्रपूरच्या दारूबदंीने जिल्हयातील सामान्य वातावरण अस्वस्थ केलय.गावागावात दारूतस्कर तर निर्माण झालेच.पण काॅलेजकुमारही दारूविकी्रच्या भानगडीत पडले.जिल्हयातील गावागावात दारूविक्री सुरू आहे.तिप्पट,चैपट जादा भावाने हि दारूविक्री करण्यात येत आहे.त्यामुळे कामगार व कष्टक-यांच्या कुटुंबियांना मोठा फटका बसत आहे.
दारूबंदीने एका पोलीस अधिका-यासह एका पोलीसाचाही बळी घेतला.तरूण पिढी दारूला पर्याय म्हणून ड्रग्सच्या आहारी गेली आहे.गेल्या चार वर्षात दारूबंदीमुळे अतिशय विदारक परिस्थीती निर्माण झाल्याचे सुरज माडूरवार यांचे म्हणणे आहे.त्यामुळे हि अवस्था लक्षात घेता कामगारांच्या जिल्हयातील दारूबंदी तातडीने उठविण्याची मागणी त्यांनी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज चंद्रपूरात आले होते.त्यावेळी त्यांची भेट घेत निवेदनातून हि मागणी करण्यात आली.Body:विडीओ बाईट
सूरज माडूरवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.