चंद्रपूर - ताडोबातील प्रसिद्ध माया वाघिणीचे अपत्य असलेली मीरा ही 2 वर्षांची वाघीण मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. मीराच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा दिसून आल्याने, मोठ्या प्राण्याची शिकार करताना शिंग लागल्याचा अंदाज ताडोबा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा - गोंडपिपरी तालुक्यातील शेती वन्यजीवांच्या हैदोसामुळे संकटात, शेतकरी चिंतेत
गेल्या वर्षभरात माया वाघिणीने पर्यटकांना चांगलंच आकर्षित केले होते. तिची क्रेझ पाहून ताडोबात तिची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. याच मायाची मीरा ही मुलगी आहे. मीरा 2 वर्षांचीच असल्याने शिकारीचे तंत्र ती पूर्णपणे शिकलेली नसावी, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या या घटनेमुळे पशुप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.