ETV Bharat / state

COVID19: चंद्रपुरातील वढोली गावात 'गावबंदी'... नागरिकांचा खडा पहारा - संचारबंद चंद्रपूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करताच, त्याची तत्काळ अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी तत्काळ परिपत्रक काढून जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश दिले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सीमा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत.

curfew-applied-in-chandrapur-due-to-coronavirus outbreak
चंद्रपुरातील वढोली गावात 'गावबंदी'...
author img

By

Published : Mar 24, 2020, 12:53 PM IST

चंद्रपूर- कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवर पोलीस नजर ठेवून आहेत. तर गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील ग्रामस्थांनी दुसऱ्या जिल्हातून येणाऱ्या वाहतुकीला गावबंदी केली आहे.

चंद्रपुरातील वढोली गावात 'गावबंदी'...

हेही वाचा- CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करताच, त्याची तत्काळ अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी तत्काळ परिपत्रक काढून जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश दिले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सीमा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. तसेच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्या-येण्यास बंदी घातलण्यात आली आहे. याकडे पोलीस विभाग, शासन लक्ष ठेवून आहे.

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. या सीमेवरील वाहतूक ठप्प आहे. मात्र, चुकूनही कुणी सीमा पार करू नये, यासाठी पोलीस विभागाची चांगलीच धावाधाव होत आहे. आता गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांनी राज्य शाशनाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत पर राज्य, जिल्ह्यातील वाहतूक आणि प्रवाशांना गावबंदी केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील गावऱ्यांनी मार्ग अडवित खडा पहारा देणे सुरू केला आहे. ग्रामपंचायत वढोलीचे उपसरपंच मोहन चुदरी, सामाजिक कार्यकर्ता सुरज माडूरवार, ग्रा.पं सदस्य सुरेंद्र मंडपल्लीवर, रुपेश मेडाडे यांनी देशावर ओढावलेल्या संकटाचा लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. तर किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर आणि हात धूण्यासाठी पाणी उपलब्ध केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.