चंद्रपूर Shivani Wadettiwar : राज्य सरकारने उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने 6 सप्टेंबरला शासन निर्णय काढला. यात शिक्षण व विविध विभागांत मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. यामुळे राज्यभर विरोधाचा सुर उमटू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी युवक, विद्यार्थ्यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा (Janaakrosh Morcha) काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता दीक्षाभूमीपासून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा जनआक्रोश मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत नसून युवकांच्या स्वयंस्फूर्तीने काढण्यात येत आहे.
शिवानी वडेट्टीवार यांची सोशल मीडियावर पोस्ट : हा मोर्चा पूर्णतः राजकारण विरहित असल्याचा दावा आयोजन समितीने केला होता. यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर ज्या पोस्ट टाकल्या त्यामुळे हा मोर्चा काँग्रेसच्या नेतृत्वात काढण्यात येत असल्याचा संभ्रम निर्माण झाला. याबाबत जनआक्रोश मोर्चाच्या समन्वय समितीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वास्तविक समन्वय समितीच्या माध्यमातून मागील 15 ते 20 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या आंदोलनासंदर्भात विद्यार्थी आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना या विरोधामध्ये आंदोलनात सामील होण्यासाठीचे आव्हान करण्यात येत आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून उद्या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चा काँग्रेसचा असल्याचा संभ्रम निर्माण : मोर्चात जिल्ह्याभरातून बेरोजगार युवक आणि विद्यार्थी सामील होणार आहेत. हा संपूर्ण मोर्चा राजकारण विरहित असून कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीच्या पोस्ट टाकल्या त्यामुळे हा मोर्चा काँग्रेसचा असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र तो चुकीचा आहे असं स्पष्टीकरण ज्यांना आक्रोश समितीचे सदस्य यांच्याकडून देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये वेगवेगळे विचारसरणीचे आणि वेगवेगळ्या गटाचे लोक सामील होणार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला यात सामील होण्यास कुठलाही आक्षेप नाही. मात्र त्यांनी राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर न करता सामील होण्याचे आवाहन समन्वय समितीचे सदस्य विजय मुसळे यांनी केले आहे.
हेही वाचा -
- Congress On Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचं स्पष्ट; काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
- Vijay wadettiwar: राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत...विजय वडेट्टीवार यांचा घरचा आहेर
- Vijay Wadettiwar On OBC Meeting: ओबीसी नेत्यांची 29 सप्टेंबर रोजीची बैठक बनावट- विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार