ETV Bharat / state

डेरा आंदोलनातील कोविड योद्धांच्या भावनांचा उद्रेक; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतला काढता पाय - Pappu Deshmukh Chandrapur

नियोजन भवनातून बाहेर निघाल्यानंतरसुद्धा गनिमीकाव्याने बाहेर उभ्या असलेल्या कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना घेरले. देशमुख यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा निषेध करण्यात आला.

कोरोना योद्ध्यांचा उद्रेक
कोरोना योद्ध्यांचा उद्रेक
author img

By

Published : Apr 27, 2021, 8:08 PM IST

Updated : Apr 27, 2021, 8:16 PM IST

चंद्रपूर - गेल्या 7 महिन्यांच्या थकीत पगारासाठी मागील जवळपास तीन महिन्यापासून डेरा आंदोलन करणाऱ्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज पुन्हा एकदा उद्रेक झाला. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवन येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योद्धा महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत मंत्री देशमुख यांना धारेवर धरले. यावेळी कामगारांच्या भावनेचा उद्रेक झाला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. योद्धा महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत त्यांच्याकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. कामगारांचा उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह नियोजन भवनातून काढता पाय घेतला.

डेरा आंदोलनातील कोविड योद्धांच्या भावनांचा उद्रेक

हेही वाचा-कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर

'गो-बॅक' अमित देशमुखच्या घोषणा

नियोजन भवनातून बाहेर निघाल्यानंतरसुद्धा गनिमीकाव्याने बाहेर उभ्या असलेल्या कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना घेरले. देशमुख यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच 'गो-बॅक' अमित देशमुखच्या घोषणा दिल्या आहेत. 'थकीत पगार द्या, मगच जिल्ह्यात या' अशाही यावेळी घोषणाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-राहुल गांधी यांच्यावर विडंबनात्मक जाहिरात; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची अंधेरीत तोडफोड

किमान वेतन लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 'गो-बॅक' अमित देशमुखची घोषणा देण्यात आल्या आहेत. 'आधी कोविड योद्धांचे थकित पगार द्या, मगच चंद्रपूर जिल्ह्यात या' असा इशारा पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दंगल नियंत्रण पथक व पोलिसांचा फौजफाटा अमित देशमुख यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आला होता. पप्पू देशमुख यांच्यामागेही सोमवारी रात्रीपासून पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ससेमिरा लागला होता. या सर्वांना बगल देत जनविकास सेनेच्या कामगारांनी गनिमी काव्याने आज अमित देशमुख यांना काढता पाय घ्यायला लावला. जोपर्यंत थकित पगार व किमान वेतन लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशा इशारा देशमुख यांनी दिला. कामगारांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही जन विकासचे अध्यक्ष पप्पु देशमुख यांनी व्यक्त केला.

Last Updated : Apr 27, 2021, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.