चंद्रपूर- जिल्ह्यातील सभापती, उपसभापदीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने बाजी मारली. राजुरा, कोरपना, जिवती या तीन पंचायत समित्यांवर काँग्रेसने ताबा मिळविला. तर गोंडपिपरी पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकविला आहे.
हेही वाचा- 'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'
राजुरा पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेद यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मंगेश गुरनुले यांची निवड करण्यात आली आहे. कोरपना पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रुपालीताई तोडासे यांची तर उपसभापती काँग्रेसच्या सिंधुताई आस्वले यांची निवड करण्यात आली आहे. तर जिवती पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या अंजना पवार यांची निवड करण्यात आली आहे. गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सुनिता येग्गेवार तर उपसभापती भाजपचे अरुण कोडापे यांची निवड करण्यात आली आहे.