ETV Bharat / state

Chandrapur Crime : चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक - विनयभंगाच्या गुन्ह्याखाली कुणाल रामटेकेला अटक

काँग्रेसचे कुणाल रामटेके हे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहे. त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विवाहित महिलेसोबत ओळखी करून व्हाट्सअप्पद्वारे प्रेमाचा आलापकरीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम 354 व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत रामटेकेला अटक केली आहे.

अटक केलेला आरोपी कुणाल रामटेके
अटक केलेला आरोपी कुणाल रामटेके
author img

By

Published : Mar 23, 2022, 10:18 PM IST

चंद्रपूर - काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्षावर एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल रामटेके, असे या अध्यक्षाचे नाव असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विवाहित महिलेसोबत ओळखी करून व्हाट्सअप्पद्वारे प्रेमाचा आलापकरीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी कलम 354 व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत रामटेकेला अटक केली आहे.

चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा पतीसोबत वाद झाल्याने याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनासाठी पाठविले. महिलेच्या नातेवाईकमार्फत कुणाल रामटेके यांची ओळख महिलेसोबत झाली. रामटेके यांनी स्वतःला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी असल्याचे त्या महिलेसमोर दर्शविले. आता मी तुमचे समुपदेशन करण्यासाठी येणार, असे सांगितले. कुणाल रामटेके यांनी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला व्हाट्सअप्पद्वारे सतत प्रेमाचा आलापकरीत संदेश पाठविण्यात आले. कुणाल रामटेके यांनी महिलेला प्रेमाच्या आकंठात बुडण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितला. मात्र महिलेने रामटेके यांनी नकार दिला. यानंतर रामटेके यांनी त्या महिलेला होकार देण्यास सांगितले अन्यथा महिला निराधार केंद्रात पाठविण्याची धमकी दिली. रामटेके यांचे कृत्य आवाक्याबाहेर होताच महिलेने सरळ शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली.

हेही वाचा - Police Officer Suicide : चंद्रपुरात कारागृह अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.