ETV Bharat / state

काँग्रेसमधली धुसफूस चव्हाट्यावर.. मानापमानाच्या नाट्यावर आमदारांनी केला वॉकआउट - काँग्रेस नेतत्यांचा बहिष्कार

सत्ताधारी काँग्रेसच्या दोन आमदारांचा शासकीय बैठकीत अवमान झाल्याने या आमदारांनी बैठकीवरच बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री काँग्रेसचे आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडल्याने काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे दिसून आलं.

congress conflict
congress conflict
author img

By

Published : May 15, 2021, 9:08 PM IST

Updated : May 15, 2021, 9:15 PM IST

चंद्रपूर - सत्ताधारी काँग्रेसच्या दोन आमदारांचा शासकीय बैठकीत अवमान झाल्याने या आमदारांनी बैठकीवरच बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री काँग्रेसचे आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडल्याने काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे दिसून आलं.

चंद्रपूर शहरातील नियोजन भवनात आज जिल्हास्तरीय खरीप हंगामा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री विजय वडेट्टीवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीच्या बैठक व्यवस्थेवरून चांगलेच मानापमान नाट्य रंगले. अधिकारी वर्ग मंचावर तर आमदारांना प्रेक्षकांमध्ये बसविल्याने सत्ताधारी काँग्रेसचे आमदार संतप्त झाले. बैठकीला सुरुवात होताच राजुरा क्षेत्राचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या बैठकीतून काँग्रेसचे दोन आमदार व खासदार यांनी निषेध करत बहिर्गमन केले.

काँग्रेसमधली धुसफूस चव्हाट्यावर

बैठकीत प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने हे आमदार संतापले. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही पाठोपाठ वॉकआउट केले. हंगाम तोंडावर आला आहे. लोकप्रतिनिधींना अनेक विषय मांडायचे होते; मात्र त्यांचा अपमान झाला, असे बहिर्गमन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. या बहिर्गमनानंतर काही वेळातच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकच रद्द केली. पालकमंत्री काँग्रेसचे आणि अपमान देखील काँग्रेसच्याच आमदारांचा झाल्याने राजकीय-प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Last Updated : May 15, 2021, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.