चंद्रपूर - आसामचे मुख्यमंत्री हेमंत हेमंत बिस्वा शर्मा ( Assam Chief Minister Himanta Biswa Sarma ) यांच्या विरोधात चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्याच्या विरोधात एनएसयुआयने ( NSUI complaint against Assam CM ) ही तक्रार दाखल केली आहे.
सध्या उत्तराखंड राज्याची निवडणूक सुरू आहे. यावेळी भाजपच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत हेमंत बिस्वा शर्मा आले असताना कीचा येथे जनसभेला संबोधित होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान ( Assam Chief Minister over Rahul Gandhi ) केले होते. आपण राजीव गांधी यांचे पुत्र आहात. याचे पुरावे आम्ही कधी मागितले नव्हते, असे त्यांनी म्हटले. विधानानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. याच संदर्भात एनएसयुआयच्यावतीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात ( objectionable statement on Rahul Gandhi ) आली आहे.
हेही वाचा-खासदार सर्दिन यांनी मनोज पर्रीकरांवर केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध
एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव रोशनलाल बिट्टू ( Roshanlal Bittu police complaint ) यांनी याबाबत ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाणार असे पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिले आहे. ही माहिती रोशनलाल बिट्टू यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.