ETV Bharat / state

CM Shindes financial aid : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसहाय्य, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर (Ballarpur railway station bridge accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या नीलिमा रंगारी (deceased Neelima Rangari) यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य (CM Shindes financial aid to Neelima Rangari family) देण्याचीही घोषणा आज केली आहे. latest news from Chandrapur

author img

By

Published : Nov 28, 2022, 2:07 PM IST

CM Shindes financial aid
मुख्यमंत्री शिंदे

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर (Ballarpur railway station bridge accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या नीलिमा रंगारी (deceased Neelima Rangari) यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य (CM Shindes financial aid to Neelima Rangari family) देण्याचीही घोषणा आज केली आहे. शिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. latest news from Chandrapur,

दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू : चंद्रपूरातल्या बल्लारशा रेल्वे स्टेशनवर फुटओव्हरचा ब्रिज ( Footover bridge collapsed ) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २ गंभीर जखमी आहेत. बल्लारशा रेल्वे स्टेशनवर फुटओव्हरचा ब्रिज ( Footover bridge collapsed ) कोसळून 60 फुटावरून प्रवाशी खाली पडले. ( Footover bridge collapsed at Ballarasha railway station ) आहे. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला.

फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रविवारी मोठा अपघात झाला. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. या पुलाची उंची सुमारे 60 फूट होती. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी तेथून जात होते. पुलाचा काही भाग तुटल्याने प्रवासी रेल्वे रुळावरून 60 फूट खाली पडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर.2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली.

जखमींना मदत जाहीर : रेल्वेने गंभीर जखमींना 1 लाख रुपये, साध्या जखमींना 50 रुपये देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी इतर रुग्णालयात हलवून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. फूटओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळल्यानंतर मदतकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी काझीपेट पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जात होते. दरम्यान, अचानक फूटओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. ही घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

ब्रिज दुर्घटनेत जखमी झालेल्या 9 जणांची नावे समोर : फुटओव्हर ब्रिज दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 जणांची नावे समोर आली आहेत. जखमींचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी फुटओव्हर ब्रिज दुर्घटनेबाबत सीपीआरओ सीआर शिवाजी सुतार यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी ५.१० वाजता नागपूर विभागातील बल्हारशाह येथे फूट ओव्हरब्रिजच्या स्लॅबचा काही भाग पडला.

जखमींवर उपचार सुरू : या घटनेत अनेक जण जखमी झाले असून सर्वांना प्राथमिक उपचारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. यामध्ये रंजना खडतड, छाया भगत, नीलिमा रंगारी, साची पाटील, निधी भगत, चैतन्य भगत, अंजली वर्मा, प्रिया खडतड, अनुराग खडतड यांचा समावेश आहे. यापैकी नीलिमा रंगारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन जण हे गंभीर आहेत. या दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाने मदत जाहीर केली असून या अपघाताची चौकशी देखील होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.