चंद्रपूर - एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून 3 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. अमरप्रेम जुमडे, असे या लिपिकाचे नाव आहे.
हेही वाचा - चिमूर तालुक्यातील १९३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका
याबाबत अधिक माहिती अशी की, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सेवानिवृत्त असलेल्या तक्रारदाराला वरिष्ठ सहायक या पदावर असलेल्या अमरप्रेम जुमडे याने 3 हजारांची मागणी केली. तो पैशासाठी त्रास देत होता. याबाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
हेही वाचा - जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून लाचखोर कर्मचाऱ्याला अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या पथकाने केली.