ETV Bharat / state

'बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल', चिमूर मतदारसंघातील खेड येथील घटना

author img

By

Published : Oct 13, 2019, 1:39 PM IST

चिमूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील मितेश भांगडिया यांच्या सभेदरम्यान गावातील एका तरूणाने बेरोजगारीवर प्रश्न विचारला. मात्र तरूणाच्या या प्रश्नांमुळे भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी या तरूणाला बेदम चोप दिला, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मितेश भांगडिया यांची खेड तिमुर येथे सभा

चंद्रपूर - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. शनिवारी ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथे भाजपचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील मितेश भांगडिया यांनी सभा घेतली होती. यावेळी त्यांच्या भाषणा दरम्यान गावातील एका तरूणाने बेरोजगारीवर प्रश्न विचारला. मात्र तरूणाच्या या प्रश्नांमुळे भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी या तरूणाला बेदम चोप दिला, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मितेश भांगडिया यांनी बेरोजगारी बद्दल प्रश्न विचारल्यानंतर तरूणाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहान

हेही वाचा... निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राम मंदिर आठवतेय - सूभाष धोटे

सामान्यतः प्रचार दरम्यान होणाऱ्या सभांमध्ये सामान्य नागरीक जेव्हा प्रतिनिधींना प्रश्न विचारतात, उत्तर नसल्यास काही प्रतिनिधी शांतपणे ते सर्व ऐकण्याची भुमिका घेतात. मात्र कार्यकर्त्यांचा तिडपापड होताना दिसतो. यामुळे क्रोधीत झालेले कार्यकर्ते असे पाऊल उचलताना दिसत आहे. याची प्रचिती चिमूर विधानसभा मतदारसंघातही आली आहे. खेड येथील या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सध्या संपूर्ण मतदारसंघात याची चर्चा होत आहे.

हेही वाचा... चंद्रपुरात शासकीय नोकरदारांना आवास योजनेचा लाभ, खरे लाभार्थी वंचित

खेड या गावातील युवक प्रतिक डांगे या तरुणाने विधानपरिषदेचे माजी सदस्य मितेश भांगडिया यांना मतदारसंघातील बेरोजगारी बाबत प्रश्न उपस्थीत केला. यावेळी त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहान करण्यात आली. त्यामुळे बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. बेरोजगारीवर प्रश्न विचारणारा हा युवक नशेत होता, मात्र त्याने केलेला प्रश्न वास्तव असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून मात्र या तरूणाद्वारे सभा उधडून लावण्याचा डाव विरोधकांनी केला असल्याचा कांगावा सुरु केला आहे.

Intro:बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल
चिमूर विधानसभा क्षेत्रातिल खेड येथील घटना
चंद्रपूर MHC10019
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकी करीता प्रचार शिगेला पोहचला आहे . मात्र या प्रचार सभा मध्ये सामान्य नागरीक किंवा तरूणांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्याकडे ठोस उत्तर नसल्याने कार्यकर्ते क्रोधीत होत आहेत . याची प्रचिती चिमूर विधान सभा निर्वाचण क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथे आली . गावातील युवक प्रतिक डांगे यांतरुणाने विधान परिषदेचे माजी सदस्य मितेश भांगडिया यांना निर्वाचण क्षेत्रातील बेरोजगारी वर सवाल केला असता त्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहान करण्यात आले . त्यामूळे बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल अशी परिस्थिती झालेली आहे .
चिमूर विधानसभा क्षेत्राकरीता भाजपाचे विद्यमान आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रचारा करीता त्यांचे वडील माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया क्षेत्रात सभा घेत आहेत .ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथे त्यांच्या भाषणा दरम्यान गावातील तरूणाने बेरोजगारीवर प्रश्न विचारला मात्र त्याच्या या प्रश्नांने भाजपा कार्यकर्त्यांचे तिळपापळ झाले आणी त्यांनी या तरूणाला चांगला चोप दिला . यामूळे युवक सुद्धा बिथरला . हे दोन्ही व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असुन संपूर्ण विधानसभा क्षेत्रात याची चर्चा होत आहे .
बेरोजगारीवर प्रश्न विचारणारा हा पिऊन होता मात्र त्यानी केलेला प्रश्न हा वास्तव आहे . भाजपा कडून या तरूणा द्वारे सभा उधडून लावण्याचा डाव विरोधकांनी केला असल्याचा कांगावा सुरु केला आहे . यात किती सत्य आहे हा संशोधनाचा विषय असला तरी निर्वाचण क्षेत्रात बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे .

Body:चिमूर विधानसभा क्षेत्रातील खेड येथील व्हायरल व्हिडिओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.