चंद्रपूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. ज्येष्ठ सदस्य संध्या गुरनुले यांची अध्यक्षा म्हणून तर रेखा कारेकर यांची उपाध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. गुरनुले यांनी काँग्रेसच्या वैशाली शेरके यांचा तर रेखा कारेकर यांनी खेमराज मरसकोल्हे यांचा ३६ विरूध्द २० अशा मत फरकाने पराभव केला.
हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'
चंद्रपूर जिल्हा परिषदेत एकूण 56 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे 36 एवढे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होईल, हे जवळपास निश्चित होते. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी काळजी घेतली. त्यामुळे काँग्रेसला फोडाफोडीच्या प्रयत्नात अपयश आले.
हेही वाचा... नाशिकहून गंगासागरला जाणारी भाविकांची बस पलटली; अपघातात एकाचा मृत्यू तर, 26 जण जखमी
संध्या गुरनुले या दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाल्या. यावेळी हे पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर मुनगंटीवार यांनीही जिल्हा परिषदेत पोहोचून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच जनसेवेचे आश्वासन दिले. तर, नवनिर्वाचित अध्यक्षा संध्या गुरनुले यांनीही पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.