ETV Bharat / state

चंद्रपूर पोलिसांचे धाडसी 'ऑपरेशन ककराला'; उत्तरप्रदेशात जाऊन आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला पकडले - crime in chandrapur

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. राज्यात ठिकठिकाणी सुनियोजितरित्या बँकफोडी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या उत्तरप्रदेशात जाऊन मूसक्या आवळण्यात आल्या.

author img

By

Published : Apr 3, 2021, 7:47 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. राज्यात ठिकठिकाणी सुनियोजितरित्या बँकफोडी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या उत्तरप्रदेशात जाऊन मूसक्या आवळण्यात आल्या. या टोळीचा म्होरक्या नवाब उल हसन आणि त्याचा साथीदार दानविर हे उत्तरप्रदेशातील ककरला या गावात राहात असल्याने 'ऑपरेशन ककराला' राबविण्यात आले.

या संपूर्ण कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुख्य आरोपीसह तीन स्थानिक आरोपींना पकडण्यात आले आहे. या कारवाईत एकूण एक कोटी सात लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी एक कोटीच्या दोन किलो 800 ग्राम सोन्याचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
असा झाला तपास-

20 मार्च रोजी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी बँकेची मागची खिडकी गॅसकटरने कापून आत प्रवेश केला. लोखंडी तिजोरी गॅसकटरने कापून आता ठेवलेलेला 7 लाख नगदी आणि 93 ग्रॅम सोने, असा साडे अकरा लाखांचा माल चोरी केला. चंद्रपूर पोलिसांना याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी श्वानपथक, अंगुलीमुद्रा पथक, सायबर पथकाला पाचारण करीत परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी तपास सुरू केला.

आधीही घडल्या होत्या अशाच घटना-

यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील माढेळी येथे 2013 मध्ये असाच गुन्हा घडला होता. यात आरोपिंना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली होती. तसेच यापूर्वी भंडारा, गोंदिया आणि तेलंगाना राज्यात असाच गुन्हा घडला होता. स्थानीय गुन्हे शाखेने या गुह्यांचा सखोल तपास केला असता उत्तरप्रदेशमधील बदायू जिल्ह्यातील ककराला या गावातील आरोपीचे नाव समोर आले. सोबत राज्यातील त्याचे काही सहकारी असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार बोबडे आणि कापडे यांच्या पथकाने 26 मार्चला गोंदिया जिल्ह्यातील हेटी गावातून देवीदास कापगते, राजू वरभे तसेच संकेत उके याला पडोली येथून अटक करण्यात आली.

या आरोपींना इंगा दाखवल्यावर उत्तरप्रदेशातील ककराला येथे राहणाऱ्या सर्व आरोपींची ठिकाणे सांगितली. यानंतर बोबडे आणि कापडे यांचे पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले. 29 मार्चला 'ऑपरेशन ककरा'ला सुरुवात झाली. 31 मार्चला मुख्य आरोपी नवाब उल हसन हा हसनपूर येथे त्याचा साथीदार दानवीर याला भेटण्यासाठी येणार, अशी माहिती मिळाली. त्यानुसार चार ठिकाणी पथक तैनात करण्यात आले. हे दोघे आलापूर मार्गावरील शेताजवळ थांबून आहेत, अशी माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन धाड टाकली असता हे दोन्ही आरोपी पळून जायचा प्रयत्न करू लागले. झटापटीत सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या हाताला जबर दुखापत झाली तर पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या हाताला देखील किरकोळ मार लागला. मात्र, दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही माहिती मिळताच या गावातील अन्य आरोपी पसार झाले. मुख्य आरोपी हसन याच्या घराची झडती घेतली असता तब्बल 2 किलो 800 ग्रॅम इतके सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

असे करायचे बँक फोडी-

हे एक मोठे रॅकेट होते. यात स्थानिक गुन्हेगारांना सामील केले जायचे. प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी होती. रेकी करणारा वेगळा, गॅसकटर वापरणारा वेगळा, तोडफोड करणारा वेगळा. महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा राज्यात देखील हे रॅकेट असेच गुन्हेगारी करीत होते. या सर्व आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा- अँटिलिया स्फोटके प्रकरण: सचिन वाझेची 'एनआयए' कोठडी वाढवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.