ETV Bharat / state

Chandrapur News : पोलिसांचे देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील वादात, आतंकवादाचा धर्म ठरवल्याचा आरोप - देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील

चंद्रपूरमध्ये पोलिसांकडून नुकतेच मॉकड्रील पार पडले. देवस्थानावर होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील वादात सापडले आहे. आंतकवादी झालेल्या पोलिसांनी 'अल्लाह हो अकबर' अशा घोषणासुद्धा दिल्या. त्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

mockdrill
वादग्रस्त मॉकड्रिलवर वकिलांनी घेतला तीव्र आक्षेप
author img

By

Published : Jan 21, 2023, 11:55 AM IST

आतंकवादाचा धर्म ठरवल्याचा आरोप

चंद्रपूर : कुठलाही धर्म, पंथ, भाषा याला झुकते माप न देता, पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन न बाळगता, कुठलाही भेदभाव न करता कर्तव्य बजावण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने पोलीस विभागाला दिली आहे. मात्र धार्मिक विषमतेचे विष सभोवताली पेरले जात असताना पोलीस विभागातही हे विष बेमालूमपणे पसरले की काय? असे म्हणायची वेळ चंद्रपूरमध्ये आली आहे.

देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील : आतंकवादाला कुठला धर्म नसतो असे म्हणतात. मात्र चंद्रपूर पोलिसांनी या आतंकवादावर एका विशिष्ट धर्माचा शिक्कामोर्तब केला. देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील करताना चक्क मुस्लिम समाजाला आंतकवादी म्हणून दाखविण्यात आले. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. आंतकवादी झालेल्या पोलिसांनी 'अल्लाह हो अकबर' अशा घोषणासुद्धा दिल्या. या प्रकारावर प्रतिष्ठित वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

अल्लाह हो अकबरच्या घोषणा : चंद्रपूर पोलिसांनी ११ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध महाकाली देवस्थानावर अतिरेकी हल्याचे मॉक ड्रील केले. यात मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सहभागी झाले होते. आंतकवाद्यांचा हल्ला मोडून काढण्यासाठी जी यंत्रणा पोलीसांनी हवी, त्या सर्वांचा वापर या मॉकड्रीलमध्ये करण्यात आला. महाकाली मंदिर परिसरात अतिरेक्यांनी काही सामान्य लोकांना बंधक बनवले. या सामान्य नागरिकांची सुटका करून अतिरेक्यांना अटक करण्याची तालीम या मॉकड्रिलमध्ये करण्यात आली. हे अतिरेकी बंधक बनविलेल्या नागरिकांसमोर "अल्ला हु अकबर" अशी नारेबाजी करतात हे देखील या मॉकड्रिलचा एक महत्वाचा भाग होता. मात्र हे संपूर्ण नाट्य घडत असताना काही सामान्य नागरिकांनी हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांच्या या पूर्वग्रहदूषित मानसिकतेने केलेल्या कृत्यावर आता मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशिष्ट समाजाचेच नागरिक अतिरेकी असल्याचा समज : मॉकड्रीलच्या माध्यमातून विशिष्ट समाजाचेच नागरिक अतिरेकी असतात, असा समज रुढ केला जात आहे. जाणीवपूर्वक समाजात हे पसरविले जात आहे. हा धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न आहे. याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी मुस्मिल समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली. या शिष्टमंडळात अ‍ॅड. फरहान बेग, अ‍ॅड. जावेद शेख, अ‍ॅड. कल्याण कुमार, अ‍ॅड. रफीक शेख, अ‍ॅड. दाऊद शेख यांचा समावेश होता. अद्याप पोलीस यंत्रणेने संबंधितांवर कारवाई केली नाही. ही चूक अवधानाने झाली, अशी सावरासावर त्यांच्याकडून केली जात आहे. मागील काही वर्षांपासून समाज माध्यमांवर विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याचा प्रकार वाढला आहे. त्याचे पडसाद समाजात अनेकदा हिसंक घटनांच्या स्वरुपात उमटले आहे.

अशी चूक पुन्हा होणार नाही : मॉकड्रील पोलिसांची अंतर्गत बाब आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा यात हेतू नव्हता. ही चूक अनवधानाने झाली असून भविष्यात अशा चुका होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी दिली. मात्र, पोलिसांसारखी कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणाच या धार्मिक द्वेषाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Kesari Kitab Kusti Competition : महाराष्ट्र 'केसरी'सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण ; 'हे' मल्ल थार, टॅक्ट्ररसह, जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे ठरले मानकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.