चंद्रपूर - संसदेत मंजूर झालेले नागरिकता संशोधन विधेयक मुस्लीम समाजावर अन्याय करणारे असून राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 21 चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे ते परत घेतले जावे, या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले.
स्थानिक जटपुरा गेटजवळ हे आंदोलन सुरू असून, यात मुस्लीम बांधवांसोबतच बहुजन समाजातील संघटनाही सहभागी झाल्या आहेत. या विधेयकसंबंधी मुस्लीम बांधवांच्या भावना तीव्र असून विधेयक मंजूर झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सध्या संसदेत मांडले जात असलेल्या नागरिकता संशोधन विधेयकावर मोठा गदारोळ होत आहे. ह्याचे पडसाद देशभरात दिसून येत आहेत. आज चंद्रपुरात या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.