ETV Bharat / state

Chandrapur Murder : तुरुंगातुन सुटून आल्यानंतर दोन दिवसानंतर खून, अटकेनंतरच्या 'त्या' कृत्यानं पोलीसही चक्रावले!

Chandrapur Murder चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात एका वृद्धाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. मधुकर मंदेवार (वय ६५) असं हत्या करण्यात आलेल्या वृद्धाचं नाव आहे.

Gol Bazar Murder
Gol Bazar Murder
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 10:47 PM IST

रीना जनबंधु यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर Chandrapur Murder : चोरीच्या किरकोळ गुन्ह्यात तुरुंगवास भोगून आलेल्या आरोपीनं दोनच दिवसांत एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यानंतरही तो चित्रपटाचे गाणे गुणगुणत होता. आरोपी नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळं त्यान नशा करण्यासाठी हत्या केल्याची कबूली दिली आहे.

धारदार शस्त्रानं हत्या : मधुकर मंदेवार (वय ६५) असं हत्या करण्यात आलेल्याचं नाव आहे. त्यांना सर्वजण नामदेव या नावानं ओळखत होते. ते शहरातील गोल बाजार परिसरात राहत होते. आज, 3 सप्टेंबरला सकाळी शहरातील गोलबाजार परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री त्यांचा गोलबाजार येथील भाजी मार्केट परिसरात आरोपींनं धारदार शस्त्रानं हत्या केली.

तीन तासांत आरोपीला बेड्या : मात्र, ही हत्या कोणी केली याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत परिसराची पहाणी केली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार त्यांच्या पथकासह गोलबाजार परिसरात दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या तीन तासांत अंचलेश्वर गेट परिसरातून अजय शालिकराम ( ४३ वर्ष ) याला अटक केली.

तीक्ष्ण हत्यारानं गळ्यावर वार : आरोपी अजयला ड्रग्जचं व्यसन आहे. अजयनं वृद्ध मधुकरची झडती घेत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांची यावेळी चांगलीच झटापट झाली. अखेर आरोपीनं तीक्ष्ण हत्यारानं मधुकरच्या गळ्यावर वार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीला शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अजय शालिकराम याच्यावर दुचाकी चोरीचं तब्बल ५ गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्याला अंमली पदार्थांचं व्यसन आहे, त्यामुळं शनिवारी रात्री लुटमारीच्या उद्देशानं बाहेर गेला होता. यातूनच त्यानं हत्या केल्याचं उघड झालंय.

हेही वाचा -

  1. Extortion Money from Judge : चक्क न्यायाधीशांकडे मागितली 15 लाखांची खंडणी, जीएसटी निरीक्षकासह कथित पत्रकाराविरोधात गु्न्हा दाखल
  2. Hemant Parakh Kidnapping: अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक हेमंत पारख यांची सुरतजवळ सुटका. नेमकं काय घडलं?
  3. Cut Private Parts : तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्यानं खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.