ETV Bharat / state

'मदत महापालिकेची, लेबल मात्र भाजपचे'... नगरसेवकानेच केला पर्दाफाश

author img

By

Published : Apr 9, 2020, 4:06 PM IST

कोरोना विषाणू संक्रमणाच्या आपत्तीमध्ये अनेक मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांना भोजन वाटप करण्याचा समाजपयोगी उपक्रम चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मागील पंधरा दिवसांपासून सुरु आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून गरजू लोकांना भोजनाचे डबे पोहोचवण्यात येतात.

chandrapur Municipal Corporation
chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर - कोरोनामुळे संकटात असलेल्या गोरगरीबांना जेवण पुरवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम चंद्रपूर महापालिका राबवत आहे. मात्र, या जेवणांच्या डब्यांवर चक्क भाजपचे लेबल लावले जात आहे. पालिकेमार्फत गरजूंना वितरित करण्यात येणाऱ्या या अन्नावर भाजपचे लेबल असल्याची धक्कादायक माहिती पालिकेतील जन विकास सेनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक पप्पू देशमुख यांनी उघड केली आहे.

चंद्रपूर महापालिकेतील धक्कादायक वास्तव... 'मदत महापालिकेची, लेबल मात्र भाजपचे

हेही वाचा... कोरोना : पाकिस्तान सरकार हतबल; अख्तरने मागितली भारताकडे मदत

कोरोना विषाणू संक्रमणाच्या आपत्तीमध्ये अनेक मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांना भोजन वाटप करण्याचा समाजपयोगी उपक्रम चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मागील पंधरा दिवसांपासून सुरु आहे. प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून गरजू लोकांना भोजनाचे डबे पोहोचवण्यात येतात.

प्रथम पालिकेच्या तीनही क्षेत्रांमध्ये डब्यांचे समान वाटप करण्यात येते. त्यानंतर प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून हे डबे गरजूपर्यंत पोहोचण्यात येतात. सुरुवातीला महानगरातील काही स्वयंसेवी संस्थांनी मनपाला डबे पुरवले. परंतु मनपाचे पदाधिकारी स्वतः च्या पक्षाचे लेबल लावून डबे वाटप करत असल्याची बाब स्वयंसेवी संस्थेच्या लक्षात आल्याने त्यांनी जेवणाचे डबे देणे बंद केले. यानंतर डबे वितरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली.

हेही वाचा... कोरोनाचा पालेभाज्या आणि फळांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल; जाणून घ्या माहिती एका क्लिकवर...

मनपाच्या निधीतून तयार होत असलेले हजारो भोजनाचे डबे परस्पर सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपचे काही पदाधिकारी उचलत असून त्याचे वाटप माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लेबल लावून वितरित करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक पप्पू देशमुख यांना मिळाली. त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अचानक आकाशवाणी केंद्राजवळील वडगाव रोडवरील भोजनाचे कंत्राट मिळालेल्या एका कंत्राटदाराच्या घरी धडक दिली. त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या भाजप पक्षाच्या काही वाहनांची आणि त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या भोजनाच्या डब्याचा व्हिडिओ काढून सदर कंत्राटदाराला याचा जाब विचारला.

त्यावेळी कंत्राटदाराने संशयास्पद उत्तरे दिली. यावरून पक्षाच्या नावाखाली केवळ राजकीय हेतूने सर्रासपणे भोजन वाटप करण्यासाठी जेवणाचे डबे नेण्यात येत आहेत. मात्र. याचा खर्च मनपाच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. या सर्व गैरप्रकराची तक्रार नगरसेवक देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मनपा आयुक्त मोहिते यांच्याकडे केली असून याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.