ETV Bharat / state

गर्दी न जमण्यासाठी मनपाचा उपाय; बाहेर पडण्यासाठी देणार वेगवेगळे पासेस - chandrapur lockdown

आता मनपाकडून शहरातील प्रत्येक कुटुंबाला एक पास दिला जाणार आहे. त्यावर या कुटुंबातील एका सदस्याला आठवड्यातून दोनदा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी त्यांच्या परिसरात जाण्याची मूभा मिळणार आहे.

chandrapur lockdown
गर्दी न जमण्यासाठी मनपाचा उपाय; बाहेर पडण्यासाठी देणार वेगवेगळे पासेस, उल्लंघन केल्यास कारवाई
author img

By

Published : Apr 16, 2020, 3:17 PM IST

चंद्रपूर - लॉकडाऊन असतानाही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळते. या खऱ्या गरजवतांसोबत हौशी आपली फिरण्याची हौस भागवितात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जातो. या पार्श्वभूमीवर आता मनपाकडून शहरातील प्रत्येक कुटुंबाला एक पास दिला जाणार आहे. त्यावर या कुटुंबातील एका सदस्याला आठवड्यातून दोनदा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी त्यांच्या परिसरात जाण्याची मुभा मिळणार आहे. प्रभागनिहाय या पासचा रंग वेगळा असणार आहे. पासवर नमूद क्षेत्राचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल.

राजेश मोहिते, आयुक्त, मनपा चंद्रपूर

लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवली आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नाही. मात्र, भविष्यात याची लागण होऊ नये. हा जिल्हा 'झिरो डिस्ट्रीक' राहावा, यासाठी प्रशासन आता सक्तीचे पाऊल उचलणार आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकान सुरू आहे. भाजी बाजार सकाळीच सुरू होता. यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळते. शहरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे. परकोटाच्या चारही खिडक्या बंद केल्या आहे. लोकांनी सामाजिक दूर पाळावी, यासाठी कटाक्षाने प्रयत्न केले जात आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान आणि भाजी बाजारात सोशल डिन्सिटींगला हरताळ फासला जात आहे. विनाकारण घराबाहेर निघणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याउपरही ही संख्या कमी झाली नाही.

या पार्श्वभूमिवर कोरानोचा संसर्ग टाळण्यासाठी आता प्रशासनाकडून सक्तीचे पाऊल उचलले जाणार आहे. यासाठी शहराची चार भागात विभागणी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांना आशा वर्करच्या माध्यमातून लवकरच पासेस दिले जाणार आहे. या पासेच्या भरवशावर कुटुंबातील एका सदस्याला आठवड्यातून दोन घराबाहेर औषधी, किराणा आणि भाजी घ्यायला घराबाहेर पडतात. या पासवर ती व्यक्ती शहरातील कोणत्या विभागाची आहे, हे नमूद केलेले असेल. शहरातील प्रत्येक भागात जीवनावश्यक वस्तू आणि औषधींची दुकान आहे. त्यामुळे आपला परिसराची सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यास सबंधित व्यक्तींवर पोलीस कारवाई केली जाणार, असे मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी सांगितले. यामुळे गर्दी कमी होईल आणि सोशल डिस्टंसिंग योग्य रितीने पाळली जाईल, असा प्रयत्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.