ETV Bharat / state

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात 'गाढवांचे' साम्राज्य? कोरोनाच्या काळातही प्रशासन गाफील

जिल्ह्याचे केंद्र असलेल्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले. येथे स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून ऑक्सिजन केंद्रावर चक्क गाढवांचा मुक्तसंचार होताना दिसला.

unclean state Chandrapur Medical College
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय अस्वच्छता बातमी
author img

By

Published : Feb 27, 2021, 10:57 PM IST

चंद्रपूर - राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रसार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यासाठी आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, चंद्रपूरचे आरोग्य प्रशासन यामध्ये संपूर्णपणे गाफील असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्याचे केंद्र असलेल्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले. येथे स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून ऑक्सिजन केंद्रावर चक्क गाढवांचा मुक्तसंचार होताना दिसला. यावरून कोरोना संकटाला हाताळण्यासाठी प्रशासन किती गंभीर आहे, हे विचार करण्यासारखे आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी आणि कामगार नेते पप्पू देशमुख

हेही वाचा - तेलंगाणा राज्यात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना तूर्तास दिलासा

सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्माचे ठिकाण. गोरगरिबांना याच रुग्णालयाचा मोठा आधार असतो. पण, हेच रुग्णालय रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत असेल, तर गरिबांनी जायचे कुठे, असा प्रश्न पडतो. हा प्रश्न यासाठी पडला आहे की, चंद्रपूरचे जिल्हा रुग्णालय त्या स्थितीत आहे. जिल्हा रुग्णालयाचे संचालन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत आहे. पण, या संस्थेच्या प्रमुखाला रुग्णालयाच्या सोयीसुविधांशी काही देणेघेणेच उरलेले नाही, असे चित्र बघायला मिळत आहे.

जिल्हा रुग्णालयात जाऊन ईटीव्ही भारतच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा धक्कादायक चित्र नजरेस पडले. महत्वाच्या कक्षांसामोर कुत्री-डुकरांची हजेरी होती. वैद्यकीय कचऱ्याच्या पिशव्यांचा खच याच परिसरात पडून होता. शौचालये घाणीने माखलेली, दारे तुटलेली, ऑक्सिजन कक्षात गाढवाची उपस्थिती, जागोजागी कचऱ्याचे ढीग, प्रत्येक ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या, दुर्गंधी, इमारतीला लागूनच भंगार, असे विदारक चित्र इथे दिसून आले. हे चित्र तर रुग्णालयाच्या बाहेरचे आहे. आतमध्ये यापेक्षा वेगळे नाही. रुग्णालयात जाण्याची परवानगी नसल्याने आतमध्ये नेमकी काय स्थिती आहे, याचे चित्र समोर येऊ दिले जात नाही. गेल्या महिनाभरापासून येथील स्वच्छता कर्मचारी आंदोलन करीत आहेत. पाच महिन्यांचे त्यांचे वेतन थकल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ज्यांच्या खांद्यावर रुग्णालयाच्या स्वच्छतेचा भार आहे, त्याच स्वच्छतादुतांना पाच-पाच महिने वेतन नाही. त्यांच्या समस्येवर तोडगा काढायला अधिष्ठाता यांच्याकडे वेळ नाही.

आता कोरोनाने नव्याने तोंड वर काढले आहे. रुग्ण वाढत चालले. अशा गंभीर स्थितीत रुग्णालयाची ही केविलवाणी स्थिती असेल, तर कोरोनाशी कसे लढायचे, असा प्रश्न पडतो. रुग्णालयाची स्थिती एवढी गंभीर असूनही शासकीच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण हुमने हे बोलायला तयार नाहीत. फोन केला की ते बाहेरच असतात. त्यामुळे, हे रुग्णालय सध्या रामभरोसे असल्याचे दिसून येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अजून इमारत पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अजूनही जिल्हा रुग्णालयातच या महाविद्यालयाचा कारभार सुरू आहे. येथे अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत, जी अजूनही भरण्यात आलेली नाहीत. ग्रामीण रुग्णालयांची स्थिती सध्या बऱ्यापैकी असली, तरी रिक्त पदांची समस्या मोठी आहे. त्यामुळे, विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. जिल्ह्यात 9 ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये आहेत. त्यात वर्ग एकची अकरा पदे, वर्ग दोनची 20 टक्के पदे, वर्ग तीन आणि चारची 25 पदे रिक्त आहेत.

हेही वाचा - बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.