ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोनाचा भडका: 784 नव्या रूग्णांसह 9 जणांचा मृत्यू - Chandrapur vaccination

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 260 झाली आहे. सध्या 4 हजार 227 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 784 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Apr 9, 2021, 7:19 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 784 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याची चिंता वाढविणारी आहे. तर 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 260 झाली आहे. सध्या 4 हजार 227 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 95 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 58 हजार 663 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला व 59 वर्षीय महिला, भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष, दुर्गापूर,चंद्रपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील 68 वर्षीय महिला, ब्रम्हापूरी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 465 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 422, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे

शुक्रवारी बाधीत आलेल्या 784 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 197, चंद्रपूर तालुका 40, बल्लारपूर 64, भद्रावती 35, ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22, मूल 19, सावली 16, पोंभुर्णा गोंडपिपरी 6, राजूरा 23, चिमूर 101, वरोरा 118, कोरपना 58, जीवती 1 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.