चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत 816 कोरोना बाधित उपचारानंतर बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 1 हजार 195 झाली आहे. गेल्या 24 तासात 30 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्याांची संख्या 368 झाली आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉन येथे जावे तसेच तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वतः नोंदणी व आरोग्य तपासणी करून संस्थात्मक अलगीकरणात रहावे. स्वतः आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण महत्वाचे आहे. संस्थात्मक अलगीकरणात आरोग्यविषयक सर्व सुविधा व काळजी घेण्यात येत आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज(बुधवार) पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 13 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये एसीडब्ल्यू कॉलनी परिसरातील, बोरकर नगर परिसरातील, भानग्राम वार्ड, मल्हारी बाबा सोसायटी परिसरातील, बालाजी वार्ड नंबर 2, चव्हाण कॉलनी परिसरातील, पंचशील चौक, बाबुपेठ परिसरातील रुग्ण आहेत.
राजुरा येथील दोन रुग्ण आढळून आले आहेत. कोरपना तालुक्यातील व चिमूर तालुक्यातील प्रत्येकी दोन बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील शास्त्रीनगर व राहुल नगर परिसरातील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
बल्लारपूर येथील एका बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ब्रह्मपुरी विद्या नगर येथील एक तर तालुक्यातील वायगाव येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नागभीड येथील एक तर तालुक्यातील कन्नाळ गाव येथील तीन व चिखलगाव येथील एक असे एकूण पाच बाधित पुढे आलेले आहेत.
जिल्ह्यात 20 हजार 765 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 290 पॉझिटिव्ह असून 20 हजार 475 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 606 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 115 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 663 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 195 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 25 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 94 , 19 ते 40 वर्षे वयोगटातील 686, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 291, 61 वर्षावरील 69 बाधित आहेत. तसेच 1 हजार 195 बाधितांपैकी 823 पुरुष तर 372 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
1 हजार 195 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1 हजार 081 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 रुग्ण आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 62 आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 816 बाधित कोरोनामुक्त; एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 195 - chandrapur corona
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 13 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये एसीडब्ल्यू कॉलनी परिसरातील, बोरकर नगर परिसरातील, भानग्राम वार्ड, मल्हारी बाबा सोसायटी परिसरातील, बालाजी वार्ड नंबर 2, चव्हाण कॉलनी परिसरातील, पंचशील चौक, बाबुपेठ परिसरातील रुग्ण आहेत.