ETV Bharat / state

उपग्रह अवशेषाच्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे; तब्बल 4 दिवसांनी केले नागरिकांना आवाहन - उपग्रह तुकडे चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आवाहन

शनिवार रात्री उपग्रहाचे तुकडे मानवी वस्तीत पडल्याने सारे जग हादरून गेले. एखाद्या आगीच्या गोळ्याप्रमाणे हे तुकडे सिंदेवाही तालुक्यात पडले. इतकी मोठी घटना होऊनही चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनाला अजूनही याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. ही घटना घडून गेल्याच्या तब्बल चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.

chandrapur collector appeal on satellite incident
उपग्रह तुकडे चंद्रपूर
author img

By

Published : Apr 6, 2022, 2:13 PM IST

चंद्रपूर - शनिवार रात्री उपग्रहाचे तुकडे मानवी वस्तीत पडल्याने सारे जग हादरून गेले. एखाद्या आगीच्या गोळ्याप्रमाणे हे तुकडे सिंदेवाही तालुक्यात पडले आणि सिंदेवाहीचे नाव अचानक जागतिक पटलावर आले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेण्यात आली. जगातील अनेक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांसाठी ही महत्त्वाची घटना होती. मात्र, इतकी मोठी घटना होऊनही चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनाला अजूनही याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. ही घटना घडून गेल्याच्या तब्बल चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.

हेही वाचा - Skywatch Group Chandrapur : जबाबदार यंत्रणा स्वतःहून समोर येण्याची शक्यता कमीच; उपग्रहाच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांच मत

सापडलेल्या अवशेषांना स्पर्श करू नका, त्याच्या दूर राहा, त्यासोबत सेल्फी किंवा व्हिडिओ काढू नका, असे कडकडीचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे, या तीन दिवसांत प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपासून, खगोलशास्त्रीय अभ्यासक सर्वांनी या वस्तूंना हाताळून बघितले. ज्यांना अवशेष म्हणून धातूचे गोळे भेटले त्या लोकांनी सेल्फी, व्हिडिओ काढून आपली पूर्ण हौस भागवून घेतली. यादरम्यान काहीही दुर्घटना घडू शकली असती. मात्र, जिल्हाधिकारी गुल्हाने यांना जाग आली. त्यांनी दाखवलेल्या या विशेष कर्तव्यदक्षतेमुळे पुढील होणारा धोका टळला आहे.

शनिवार 2 एप्रिलच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास आकाशात अचानक रोषणाई दिसली. कदाचित हा उल्कावर्षाव असावा, असा अनेकांचा समज झाला. मात्र, हा उल्कावर्षाव नसून एका उपग्रहाचे अवशेष होते, जे प्रचंड वेगाने मानवी वस्तीच्या परिसरात कोसळले. याच रात्री अंदाजे अडीचशे ते तीनशे किलोंची जळती रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात कोसळली. ऐन मानवी वस्तीत मात्र मोकळ्या प्लॉटमध्ये ही रिंग पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. जेव्हा रिंग पडली तेव्हा ती एका तप्त लोखंडाप्रमाणे लाल झाली होती. यामुळे नागरिकांत कमालीची भीती निर्माण झाली. ती थंड झाल्यावर लोकांनी ही वस्तू पाहण्याचे धाडस केले. याबाबतची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली.

ही रिंग सिंदेवाही पोलीस ठाण्यात जमा केली गेली. यानंतर दुसऱ्या दिवशी पवनपार या गावालगत एक मोठा धातूचा गोळा आढळून आला. त्यानंतर अनुक्रमे मेरेगाव, गुंजेवाही, असोलामेंढा बोदरा येथे हे गोळे नागरिकांना आढळून आले. ही घटना जागतिक पटलावर इतकी मोठी असताना नेमके काय झाले याचे साधे प्रसिद्धीपत्रक काढण्याची तसदी देखील जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. शनिवारी रात्री ही घटना घडली. रविवारी याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी गुल्हाने सिंदेवाहीत जाऊ शकले असते, मात्र गुल्हाने यांनी तशी तसदी घेतली नाही. या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन जिल्हाधिकारी पदाची औपचारिकता त्यांनी पूर्ण केली. जे धातूचे पाच गोळे आतापर्यंत सापडले आहेत त्यात अतिउच्च दबावात वायू साठवलेला असतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

जेव्हा उपग्रहाचे रॉकेट पृथ्वीवरून आकाशात झेप घेते त्यावेळी याच गोळ्यांमधून उच्च दबावातून इंधन सोडले जाते. याच ताकदीन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणच्या विरोधात रॉकेट झेप घेऊन शकते. शिवाय त्यातील वायू हा ज्वलनशील आहे की नाही याचीही शाश्वती नाही. जर याच गोळ्याचा स्फोट झाला तर काय अनर्थ घडू शकतो याची सहज कल्पना येण्यासारखी आहे. ही सर्व भीती असताना जिल्हा प्रशासनाने त्वरित यासंदर्भात पाऊल उचलून नागरिकांना सतर्क करणे अगत्याचे होते.

कुणीही या वस्तूंना स्पर्श करू नका, त्याचे फोटो, व्हिडिओ, सेल्फी घेऊ नका, त्याची माहिती त्वरित प्रशासनाला द्या. जिल्हाधिकारी यांचे हे आद्यकर्तव्य होते. मात्र, त्यावेळी त्यांनी तसे केले नाही. परिणामी या गोळ्यांसोबत नागरिकांनी आपली यथेच्छ हौस पूर्ण करून घेतली. ज्यांनी ज्यांनी हा गोळा बघितला त्या सर्वांनी आपल्या हातात घेऊन तो बघितला. त्यासोबत फोटोसेशन केले, सेल्फी काढल्या, एखादी मिरवणूक वाटावी अशा पद्धतीने वाजतगाजत हे गोळे प्रशासनाच्या हवाली करण्यात आले. या दरम्यान कुठलीही मोठी दुर्घटना होण्याची भीती होती, जी सुदैवाने झाली नाही.

रविवार, सोमवार, मंगळवार सलग तीन दिवस हे गोळे लोकांना आढळून येत होते. इतके दिवस उलटल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांना जाग आली. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे हे आवाहन वरातीमागून घोडे नाचविण्यासारखे आहे. त्यांच्या आवाहनाने नेमका काय फरक पडेल, हा येणारा काळच सांगू शकणार आहे. मात्र, या माध्यमातून जिल्ह्यातील घटनांबाबत जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रशासन किती सतर्क आहे याची प्रचिती येते आहे.

हेही वाचा - Remains of Satellite In Chandrapur : उपग्रहाचा चौथा अवशेष आढळला; असोलामेंढा येथे आढळला धातूचा गोळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.