ETV Bharat / state

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी किशोर जोरगेवार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - young chanda brigade

धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारिवाल कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येत असून या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष हे आक्रमक झाले होते.

यंग चंदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 21, 2019, 5:11 PM IST

Updated : Jul 21, 2019, 6:51 PM IST

चंद्रपूर - धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारिवाल कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येत असून या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष हे आक्रमक झाले होते.

यंग चंदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी रिवाल कंपनीवर मोर्चाही काढला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. अखेर ह्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र माने, धारिवाल कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे, व्यवस्थापक संदीप मुखर्जी व किशोर जोरगेवार आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चर्चेदरम्यान यंग चंदा ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झालेव त्यापैकी एकाने थेट कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे यांच्या कानशिलात लगावली.

हा सर्व प्रकार तहसीलदार माने यांच्यासमोर घडला. विशेष म्हणजे घटनास्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते. जोरगेवार यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस ठाण्यात किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात भादंवी कलम 323, 352, 504, 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

Intro:
चंद्रपुर : धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यावर हात उगारल्या प्रकरणी यंग चांदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Body:धारिवाल कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येते. या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी हा प्रश्न घेऊन धारिवाल कंपनीवर मोर्चाही काढला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. अखेर ह्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र माने, नायब तहसीलदार अजय भास्करवार, जितेंद्र गादेवार, पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळू गायगोले, तसेच धारिवाल कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे, प्रबंधक प्रवीण शंकर, व्यवस्थापक संदीप मुखर्जी आणि किशोर जोरगेवार आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या चर्चेदरम्यान जोरगेवार चे एक कार्यकर्ते ते संतप्त झाले आणि त्याने थेट कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे यांच्या कानशिलात लगावली अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काकडे बावरले यादरम्यान त्यांना आणखी थापड मारण्यात आले. विशेष म्हणजे हा प्रकार तहसीलदार माने यांच्यासमोर घडला, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते. असे असतानाही हा प्रकार घडला यावेळी जोरगेवार यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा पुढील अनर्थ कळला. या प्रकरणात शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस ठाण्यात किशोर जोरगेवार आणि त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भादंवी कलम 323, 352, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.