ETV Bharat / state

अतिवृष्टीचा फटका... 'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी - Heavy rain fall in chandrapur

गोंडपिंपरी तालुक्यात पहिल्यांदाच काळ्या तांदळाच्या लागवडीचा प्रयोग एका तरुण शेतकऱ्याने केला होता. मात्र, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काळ्या तांदळाच्या या प्रयोगावर निसर्गाने मात्र पाणी फेरले आहे.

damaged the standing crops
'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी
author img

By

Published : Oct 17, 2020, 1:43 PM IST

राजुरा (चंद्रपूर)- आयुर्वेदिक तांदूळ अशी ओळख असलेल्या काळ्या तांदळाचा प्रयोग गोंडपिपरी येथील शेतकऱ्याने केला होता. धान पीक चांगले जोपासले होते. मात्र शेतकऱ्याचा या प्रयोगावर निसर्गाने पाणी फेरले आहे. मंगळवार, बुधवार झालेल्या अतिवृष्टीने काळ्या धानाचे पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काळ्या तांदळाची शेती करणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील केलीचंद झाडे या तरुण शेतकऱ्याचा हा प्रयोग निसर्गाचा लहरीपणाने अयशस्वी ठरला आहे.

'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी
गोंडपिपरी तालुक्यातीत प्रथमच ब्लॅक राईसची लागवड करण्यात आली होती. धाबा येथील केलिचंद झाडे या तरुणाने प्रायोगिक तत्वावर तीन किलो धानाच्या बियाचे रोप लागवड केले. धानाचे पीकही चांगले आले होते. पहिल्यांदाच प्रयोग केलेल्या या धान पिकाने परिसरातील तांदुळ उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. अनेक शेतकरी झाडे यांच्याशी संपर्क साधून धानाची माहिती घेत होते. मात्र या आठवड्यात आलेल्या वादळी पावसाने काळे धान जमीनदोस्त झाले आहे. धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या संकटाने खचून न जाता पुढच्या वर्षी संपुर्ण शेतात काळ्या धानाची लागवड करणार असल्याची माहिती केलीचंद झाडे या शेतकऱ्याने दिली.तांदळाचे फायदे देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे. त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. काळ्या तांदळाला मोठी मागणी आहे. त्यामुळे किंमतही चांगली मिळते. शेतकऱ्यासाठी हे काळे धान फायदेशीर ठरणारे पीक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.